क्रीडा

विराट कोहली, सनका चे शतक ते उमराण मलिकचा सर्वांत वेगवान चेंडू.. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवशीय सामन्यात झाले हे 9 मोठे विक्रम, रोहित शर्मानेही मोडला विक्रम.

विराट कोहली, सनका चे शतक ते उमराण मलिकचा सर्वांत वेगवान चेंडू.. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवशीय सामन्यात झाले हे 9 मोठे विक्रम, रोहित शर्मानेही मोडला विक्रम.


भारतीय क्रिकेट संघाने 2023 मधील पहिला एकदिवसीय सामना श्रीलंकेविरुद्ध दणदणीत जिंकला आहे. काल म्हणजेच 10 जानेवारी रोजी भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे, पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 373 धावा केल्या.

त्यामुळे ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव कधीच लयीत दिसला नाही. कारण भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी आपल्या वेगवान चेंडूंनी सातत्याने आक्रमण करून विरोधी संघाला दडपणाखाली ठेवले. सिराज आणि उमरानला अनुक्रमे 2 आणि 3 बळी मिळाले. त्यामुळे टीम इंडियाने ६७ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या मॅचमध्ये कोणते मोठे रेकॉर्ड बनवले आणि मोडले ते जाणून घेऊया.

विराट कोहली

IND vs SL 1ल्या ODI मध्ये 9 मोठे विक्रम झाले.

1. विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक झळकावले.

2. 12500 एकदिवसीय धावा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी डाव.

२५७ – विराट कोहली*
३१० – सचिन तेंडुलकर
३२८ – रिकी पाँटिंग

3. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके

९ – विराट कोहली*
8 – सचिन तेंडुलकर
७ – सईद अन्वर
६ – रोहित शर्मा*
6 – गौतम गंभीर
6 – अॅडम गिलख्रिस्ट

विराट कोहली

4. उमरान मलिकने या सामन्यात कोणत्याही भारतीय गोलंदाजाने इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. 13व्या षटकात, त्याने चौथा चेंडू 156 KMPH वेगाने टाकला, जो कोणत्याही भारतीय खेळाडूचा सर्वात वेगवान चेंडू आहे.

5. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा विराट कोहली हा दुसरा फलंदाज आहे. आता तो या फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून फक्त 5 शतके दूर आहे.

४९ – सचिन तेंडुलकर
४५ – विराट कोहली*
30 – रिकी पाँटिंग
२९ – रोहित शर्मा

6. ODI मधील सर्वोच्च 350+ धावा

३१ वेळा – भारत*
27 वेळा – दक्षिण आफ्रिका
23 वेळा – ऑस्ट्रेलिया
21 वेळा – इंग्लंड

7. विराट कोहली वनडेमध्ये सर्वाधिक M.O.M पुरस्कार जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला.

६२ – सचिन तेंडुलकर
48 – एस जयसूर्या
३७ – विराट कोहली*
32 – जॅक कॅलिस
32 – रिकी पाँटिंग
३२ – शाहिद आफ्रिदी

विराट कोहली

8. संघाने जिंकलेल्य सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके

५५ – रिकी पाँटिंग
53 – सचिन तेंडुलकर
५१ – विराट कोहली*
40 – हाशिम आमला

9. सलामीवीर म्हणून पहिल्या 150 एकदिवसीय डावात सर्वाधिक 50+ धावा

६१ – रोहित शर्मा*
५८ – हाशिम आमला
53 – सचिन तेंडुलकर
53 – शिखर धवन
52 – सौरव गांगुली


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button