क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या खूप महत्वाच्या बाजू आहेत. संघाला विजयी करण्यासाठी जेवढी गोलंदाजी महत्वाची आहे तेवढीच महत्वाची फलंदाजी सुद्धा आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी ही एकमेकांवर अवलंबून असते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या 4 खेळाडूंबद्दल सांगणार आहे जे सर्वात जास्त वेळा 99 धावांवर बाद झाले आहेत.
1) सचिन तेंडुलकर:-
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर चा या यादीत अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकर अनेक वेळा 99 धावांवर बाद झाले आहेत. सचिन तेंडुलकर एकूण तीन वेळा 99 स्कोअर वर आऊट झाला आहे. ही घटना एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, एकदा इंग्लंडविरुद्ध आणि शेवटची वेळ पाकिस्तानविरुद्ध घडली होती.
2)राहुल द्रविड़:-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज म्हणून राहुल द्रविड ला ओळखले जाते. 2004 साली राहुल द्रविडने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावनार होताच परंतु अवघ्या 99 धावांवर त्याला परतावे लागले. या सामन्यात राहुल द्रविडला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ९९ धावांवर क्लीन बोल्ड केले. राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीत एकदा 99 धावांवर आऊट झाला होता.
3) विराट कोहली:-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सुद्धा अनेक वेळा 99 धावांवर आऊट झाला आहे. 2013-14 साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली रवी रामपॉलच्या चेंडूवर 99 धावा करून बाद झाला. कोहली ९९ धावांवर बाद झाल्यामुळे वेस्ट इंडिज संघाने हा सामना 2 विकेट्स ने जिंकला.
4) रोहित शर्मा:-
रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. 23 जानेवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वा वनडे सामना खेळला जात होता. रोहित शर्मा आणि शिखर धवन मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत या सलामी जोडी ने शानदार खेळी केली होती. त्यावेळी रोहित शर्मा 99 धावांवर खेळत होता. परंतु 99 धावांवर रोहित शर्मा ला पेवेलियन मध्ये परतावे लागले.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण,तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.
हे ही वाचा:- IPL 2024: जाणून घ्या मुंबई इंडियन्सची तिकिटे बुक कशी करायची ?