आयसीसी विश्वचषक 2023 मधील 31व्या सामन्यांमध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. या पराभवासह बांगलादेश संघ विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला असून सेमी फायनल मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाल्या आहेत. कोलकत्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकात सर्व बाद 204 धावा केल्या.
प्रत्युत्तर पाकिस्तानच्या सलामीच्या खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी केली. फखर जमान आणि अब्दुल्ला यांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानने बांगलादेशचे आव्हान 32.3 षटकात पूर्ण केले. पाकिस्तानच्या विजयामुळे गुणतालिकेतील संपूर्ण गणित बदलून गेले आहे. त्यांना सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत.
2023 मध्ये सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला 14 अंकांची गरज आहे. तसे पाहता 12 गुणांसह देखील कोणताही संघ सेमी फायनल मध्ये पोहोचू शकतो. मात्र त्यासाठी इतर संघांच्या गुणांवर देखील नजर ठेवावी लागेल. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी भारत न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. सध्या गुनतालिकेत पाकिस्तानचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्यामुळे पाकिस्तानचे सहा गुण झाले आहेत.
पाकिस्तानचे दोन सामने उरले आहेत. त्यांचे पुढचे सामने न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध होणार आहेत. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी पाकच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही संघाला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. असे झाल्यास पाकिस्तानचे 10 गुण होऊ शकतात. तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी आपल्या पुढच्या सामने गमावले तर त्याचा फायदा पाकिस्तानच्या संघाला होऊ शकतो आणि संघ सेमी फायनल मध्ये पोहोचू शकतो.
सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला प्रयत्नांसोबत प्रार्थनेचे देखील गरज आहे. इतर संघ हरले तर त्याचा थेट फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. अफगाणिस्तानच्या संघाने पुढील तिन्ही सामने जिंकले तर पाकिस्तानचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चे मार्ग बंद होऊ शकतात.