IPL 2024 AUCTION: काल (१९ डिसेंबर) दुबई मध्ये आयपीएलचा पुढील हंगामासाठीचा लिलाव पार पडला. आयपीएल 2024 च्या लिलावात बोलीचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. यावेळी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली मिचेल स्टार्कवर लागली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. आजपर्यंत आयपीएलमधील कोणत्याही खेळाडूवर एवढी मोठी बोली लागलेली नाही.
लिलावानंतर आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, आयपीएल फ्रँचायझी परदेशी खेळाडूंवर एवढा विश्वास का दाखवतात? भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी असूनही त्यांना परदेशी खेळाडूंच्या तुलनेत कमी पैसे मिळतात.
आयपीएल बोली प्रक्रीयेवर आकाश चोप्राने केले मोठे वक्तव्य.
आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापेक्षा मिचेल स्टार्कसारखा खेळाडू अधिक मौल्यवान आहे, असे आकाश चोप्राचे मत आहे. विराट कोहली लिलावात आला तर त्याच्यासाठी किमान ४० ते ४२ कोटी रुपयांची बोली लागेल, असे तो म्हणतो.
तो पुढे म्हणाला की,
“आयपीएलचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे पण त्याला फक्त 12 कोटी रुपये मिळतात, तर मिच स्टार्कला 24.75 कोटी रुपये मिळतील. हे अजिबात योग्य वाटत नाही. याबाबत नवा नियम बनवावा.”
IPL 2024 AUCTION: स्टार्कला विकत घेण्यासाठी गुजरात आणि केकेआरमध्ये युद्ध झाले होते.
लिलावादरम्यान मिचेल स्टार्कचे नाव समोर आले तेव्हा, सुरुवातीला त्याला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात स्पर्धा होती पण बोली वाढतच गेल्या. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने बोली लावली.
या दोन्ही फ्रँचायझींनी स्टार्कसाठी जोरदार बोली लावली पण, शेवटी कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला आणि स्टार्कला २४.७४ कोटी रुपयांना विकत घेतले. आता स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. स्टार्क आयपीएल 2024 मध्ये केकेआरकडून खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…