‘पृथ्वी शॉ ला तिसऱ्या टी -२० सामन्यासाठी संधी देऊ नका..,त्याने धावा केल्या नाही तर?’ पृथ्वी शॉ बद्दल दिग्गजाने केले मोठे वक्तव्य
Lruthviभारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आज ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका आपल्या खिशात घालण्याची संधी असणार आहे. दरम्यान या मालिकेत पृथ्वी शॉला संधी मिळणार का? याबाबत बोलताना आकाश चोपडाने मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ ला या संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र अंतिम सामन्यात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, ईशान किशनला बाकावर बसवून, पृथ्वी शॉ ला अंतिम टी -२० सामना खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. मात्र आकाश चोपडाचे म्हणणे आहे की, पृथ्वी शॉ ऐवजी ईशान किशन आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरू शकते.
काय म्हणाला आकाश चोपडा?
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोपडा म्हणाला की, “माझ्या मते ईशान किशन आणि शुभमन गिल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात येईल. पृथ्वी शॉला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याची दोन मोठी कारणे आहेत. जर तुम्ही पृथ्वी शॉ खेळवलं तर तो एकतर धावा करेल किंवा नाही. जर त्याने धावा केल्या तर ठीक आहे आणि जर त्याने धावा केल्या नाहीत तर काय?” तसेच आकाश चोपडाने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला एकत्र संधी दिली जाणार नाही, असे देखील व

हे ही वाचा..
रिकी पाँटिंगने बनवलेले 5 रेकॉर्ड आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाही, जाणून घ्या सविस्तर.
सतत नो बॉल टाकत असलेल्या अर्शदीप सिंगला गौतम गंभीरने दिला ‘गुरुमंत्र’