आरसीबीच्या गोलंदाजाचा धमाका! रणजी ट्रॉफी सामन्यात १० गडी बाद करत घातला धुमाकूळ
एकीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे रणजी ट्रॉफी स्पर्धेत युवा खेळाडू जोरदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. बंगाल विरुध्द हरियाणा या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात युवा वेगवान गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या खेळाडूने १० गडी बाद करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकाश दीपने रणजी ट्रॉफी स्पर्धेत हरियाणा संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात जोरदार कामगिरी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी करत त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. आकाशने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ६५ धावा देत ५ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात ५१ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. अशाप्रकारे त्याने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले.
रणजी ट्रॉफी स्पर्धेसह त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेत तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद केले आहेत.आक
बंगालने जिंकला सामना..
हरियाणा संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात बंगाल संघाने १ डाव आणि ५० धावांनी सामना जिंकला आहे. बंगालने पहिल्या डावात ४१९ धावा केल्या होत्या. बंगाल संघाकडून अंशुतूप मजुमदारने १४५ धावांची खेळी केली. तर हरियाणा संघाकडून एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे हरियाणाचा पहिला डाव १६३ आणि दुसरा डाव २०६ धावांवर संपुष्टात आला.
हे ही वाचा…
चेंडू हातात असताना देखील यष्टिरक्षकाने गमावली सहज धावबादची संधी, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार