लखनऊ सुपर जायंट्स चा युवा फलंदाज आयुष बदोनी याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात कठीण परिस्थितीमध्ये असताना अर्धशतक ठोकत संघाची धावसंख्या 167 अशी सन्मान जनक स्थितीत पोहोचवण्यात मदत केली. या सामन्यात दिल्लीने 19व्या षटकात विजय मिळवला. मात्र आयुषच्या या खेळीने साऱ्यांची मने जिंकली आहेत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या या सामन्यानंतर आयुष्य या खेळीबद्दल प्रतिक्रिया देताना खुलासा केला की, त्याने मागील वर्षी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यासोबत ट्रेनिंग केली होती. त्याचा फायदा त्याला यंदाच्या आयपीएल लीग मध्ये होत आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या या सामन्यात लखनऊ सुपर जॉइंटस संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीचा फलंदाज डीकॉक हा 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर निकोलस पुरन, मार्कस टोयनीस आणि देवदत्त पडिकल सारखे धुरंदर फलंदाज फ्लॉप ठरले. लखनऊच्या संघाने 94 धावांवर सात विकेट गमावले होते.
अशा परिस्थितीत लखनऊची धावसंख्या 100च्या आत आटोपणार होती. त्यानंतर आयुष आणि अर्शद खान यांनी मिळून संघाची धावसंख्या 167 वर पोहोचले. आयुष याने 35 चेंडूत 55 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि पाच षटकार ठोकले.
आयुषने सामना संपल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले की,
“मी केएल राहुल याच्याबरोबर बराच वेळ संवाद साधला आहे. त्याने प्रत्येक वेळेस माझे समर्थन केले आहे. तो मला नेहमी म्हणत असतो की, मी सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी करू शकतो. जस्टिन लँगर यांच्यासोबत माझी चांगली बॉण्डिंग आहे. मी मागील वर्षी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तिथे त्यांच्याकडून काही क्रिकेटमधील बारकावे शिकलो. त्यामुळे माझ्या खेळामध्ये सुधारणा झाली आहे. एलएसजी ने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मला ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले होते.”
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.