एबी डिव्हिलीयर्स च्या क्रिकेट करियरमधील सर्वात शानदार आणि दमदार या 3 खेळी पाहून आश्चर्यचकित व्हाल…
एबी डिव्हिलीयर्स च्या करियरमधील सर्वात शानदार 3 खेळी पाहून चाहते सुद्धा आश्चर्यचकित..
दक्षिण आफ्रिका या संघामध्ये ३६० डिग्रीत खेळणारा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलीयर्सने २०१८ मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित करून सर्वाना आश्चर्यचकित केले. जे की एबी डिव्हिलीयर्स च्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. एबी पुन्हा एकदा आगमन करत असल्याचा चर्चेला उधाण आले होते मात्र या अफवा होत्या असे नंतर समजण्यात आले . दक्षिण आफ्रिका संघाचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी आपले मत सांगत येणाऱ्या टी20 मध्ये एबी ने पुन्हा एकदा खेळावे अशी इच्छा असल्याचे सांगितले. आज आपण एबी च्या तीन अविसमरनिय सामन्यांबद्धल सांगणार आहोत.

२१७* विरुद्ध भारत – २००८ (अहमदाबाद कसोटी):-
२००८ मध्ये दक्षिण आफ्रिका तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारत देशात आले होते. हा दुसरा कसोटी सामना अहमदाबाद मधील सरदार पटेल या स्टेडियम खेळला गेला होता आणि दक्षिण आफ्रिका या संघाने हा सामना ९० धावांनी जिंकला होता. जे की या सामन्याच्या वेळी एबी डिव्हिलियर्सने पहिल्या च सामन्यात ३३३ चेंडू खेळून २१७ धावा केल्या होत्या. जे की या सामन्यांमध्ये एबी डिव्हिलियर्सने १७ चौकार आणि २ सिक्स मारले होते. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या एवढ्या दिवसाच्या कारकिर्दीत पहिलेच द्विशतक मारले होते. जे की या सामन्यात एबी डिव्हिलियर्ससोबत दक्षिण आफ्रिका संघातील अनुभवी खेळाडू जॅक कॅलिसने १३२ धावा केल्या.
१६२* विरुद्ध वेस्ट इंडीज – २०१५ (सिडनी) :-
२०१५ मध्ये आयसीसी चा वनडे सामना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या मैदानावर खेळला गेला होता. सिडणीच्या क्रिकेट मैदानावर वनडे मालिकेतील सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघात खेळला गेला. जे की या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिज विरुद्ध 162 रन केल्या होत्या जे की एबी डिव्हिलियर्स नाबाद होता. एबी ने अगदी ६६ चेंडूत १६२ धावा केल्या होत्या. जे की या सामन्यांमध्ये एबी ने १७ चौकार तर ८ सिक्स मारले होते. जो की एबी चा २४५.४५ स्ट्राइक रेट होता. दक्षिण आफ्रिका चा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स ने ६२ चेंडू मध्ये शतक पूर्ण केले असून हा सामना २५७ धावांच्या फरकाने जिंकला.
६९* विरुद्ध इंग्लंड – 2014 (चटगाव):-
२०१४ मध्ये आयसीसीने टी20 वर्ल्डकप आयोजित केला होता जे की या वर्ल्डकप मध्ये २६ वा दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामना झाला होता. जे की या सामन्यामध्ये एबी ने २४६.४३ चा स्ट्राईक रेट ठेवत २८ बॉल मध्ये ६९ धावा केल्या होत्या. जे की एबी ने या सामन्यात ९ चौकार व ३ सिक्स मारले होते. दक्षिण आफ्रिकाने १९६/५ अशा धावा व विकेट्स गमावल्या होत्या तर इंग्लड ने १९३/७ धावा करत सात विकेट्स गमावून सामना हरला होता.