पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला दुखापतीचा सामना करावा लागतोय. टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन केले होते. मात्र स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाल्याने, त्याला मैदान सोडून जावे लागले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याला पुनरागमन करता आले नाहीये. दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. वर्तमान क्रिकेटमधील दोन्ही सर्वोत्कृष्ट गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मैदानाबाहेर असूनही,दोघांपैकी सर्वोत्तम गोलंदाज कोण? याबाबत वक्तव्य केली जात आहेत.
पाकिस्तानी दिग्गज खेळाडू अब्दुल रज्जाकने स्पष्टच म्हटले आहे की, बुमराह हा शाहीन आफ्रिदीच्या जवळपास देखील नाहीये. बुमराहने ३० कसोटी सामन्यांमध्ये १२८, ७२ वनडे सामन्यांमध्ये १२२ तर ६० टी -२० सामन्यांमध्ये ७० गडी बाद केले आहेत. तर शाहीनने २५ कसोटी सामन्यांमध्ये ९९, ३२ वनडे सामन्यांमध्ये ६२ आणि ४७ टी -२० सामन्यांमध्ये ५८ गडी बाद केले आहेत.

एका मुलाखतीत अब्दुल रज्जाकला विचारण्यात आले होते की, जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी या दोन्ही गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम गोलंदाज कोण? याबाबत बोलताना रज्जाकने म्हटले की, शाहीन सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, बुमराह त्याच्या आसपासही नाहीये. तसेच नसीम शाह, हारिस रऊफ आणि शाहीन यांच्यापैकी एका चांगल्या गोलंदाजाची निवड करण्यास सांगितले असता, त्याने तिनही गोलंदाज उत्तम असल्याचे सांगितले.
हे ही वाचा…
खवळलेली नदी शांत करण्यासाठी लेशान येथील डोंगरावर महाकाय अशी ‘बुद्ध मूर्ती’ उभारण्यात आलीय..