- Advertisement -

या पाकिस्तानी फलंदाजाने सूर्यकुमार यादवला देखील मागे सोडले, सलग 4 वेळा शून्यावर आऊट होणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला हा पाकिस्तानी..

0 2

 या पाकिस्तानी फलंदाजाने सूर्यकुमार यादवला देखील मागे सोडले, सलग 4 वेळा शून्यावर आऊट होणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला हा पाकिस्तानी..


दुसरा T20 सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (AFG vs PAK) यांच्यात शारजाह येथे खेळला गेला ज्यात राशिद खानच्या संघाने 7 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज अब्दुल्ला शफीकने(Abdullah Shafique) क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत लज्जास्पद कामगिरी आपल्या नावावर केली आहे.  त्यानंतर चाहते त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत आणि त्याची तुलना भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवशी करत आहेत.

https://youtu.be/6dTSAPgkn6E

 

खरं तर, अफगाणिस्तानने हा सामना (AFG vs PAK) केवळ 7 विकेट्सने जिंकला नाही तर मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडीही घेतली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने 19.5 षटकांत 3 गडी गमावून 133 धावा केल्या.

सूर्यकुमार यादव

अब्दुल्ला शफीकची बॅट पाकिस्तानसाठी दुसऱ्या टी-२० मध्ये कामी आली नाही आणि तो शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. एवढेच नाही तर शेवटच्या 4 टी-20 डावात त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने शून्यावर आऊट होऊन स्वतःची बदनामी केली आहे. त्याने भारताच्या मिस्टर 360 सूर्यकुमार यादवलाही मागे टाकले आहे.

टी20 मध्ये असे अनेक फलंदाज आहेत जे सलग 3 वेळा शून्यावर बाद झाले आहेत, परंतु अब्दुल्ला(Abdullah Shafique )हा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज आहे जो सलग 4 वेळा 0 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

विशेष म्हणजे, अब्दुल्ला शफीकनेही(Abdullah Shafique) शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार(Suryakumar Yadav) यादवला मागे टाकले आहे. खरे तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत सूर्याच्या बॅटला गंज चढला आणि शेवटच्या तीन वनडेत तो शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.शून्य धावांवर बाद झाल्यानंतर या भारतीय फलंदाजाला जोरदार फटका बसला. आता अब्दुल्ला शफीकने सलग ४ वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्याला मागे सोडले आहे. यावर चाहते मजेदार मीम्सही शेअर करत आहेत.

सलग 4 वेळा शून्यावर बाद होताच अब्दुल्ला शफीक(Abdullah Shafique) होतोय ट्रोल.


Leave A Reply

Your email address will not be published.