Abhiseshk Das took Superman style Catch: क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करतांना खेळाडूंनी अनेक वेळा अविश्वसनिय असे झेल घेतांना आपल याआधी देखील पहिलेच आहे. बंगाल T20 लीगमध्येही असेच एक दृश्य समोर आले आहे. ज्यामध्ये हावडा वॉरियर्सकडून खेळणारा क्रिकेटर अभिषेक दासने असा शानदार कॅच घेतला (Abhiseshk Das took Superman style Catch) की लोक चकित झाली आहेत.. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या बंगाल प्रो टी-२० लीगच्या सातव्या सामन्यात हे दृश्य पाहायला मिळाले.
सीमेजवळ सुपरमॅनसारखा उत्कृष्ट झेल,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
मेदिनीपूर विझार्ड्सकडून खेळताना दीपक कुमार महतोने शेवटच्या षटकांमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेकडे उडताना पाहून अभिषेक लाँगऑनच्या दिशेने धावला. चेंडूचा वेग ओळखून अभिषेक ‘सुपरमॅन; सारखा धावला आणि त्याने जोरदार उडी घेतली. चेंडू एकतर हातातून निसटून जाईल किंवा अभिषेक तो पकडून बाहेर फेकून देईल, असे वाटत होते, पण त्याने येथे स्वतःवर जबरदस्त असे नियंत्रण दाखवून सीमारेषेच्या अलीकडेच झेल टिपला (Abhiseshk Das took Superman style Catch) त्याचा हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतोय..
Abhiseshk Das took Superman style Catch: झेल घेतल्यानंतर शिखर धवनसारखा साजरा केला आनंद..!
अभिषेकने आपली नजर चेंडूवर ठेवली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेत प्रेक्षकांना थक्क केले. हा अप्रतिम झेल पाहून एकदा विश्वास बसणे कठीण झाले, पण पंचांनी तो क्लीन झेल असल्याचे मान्य केले. त्यामुळे महतोला बाहेर पडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर अभिषेकने शिखर धवनप्रमाणे थाप मारत सेलिब्रेशन केले.
Abhiseshk Das took Superman style Catch: पहा व्हायरल व्हिडीओ.
🏏🔥 What a catch! Abhishek Das’s incredible reflexes are absolutely breathtaking! 🤯👏
.
.#BengalProT20 #FanCode @bengalprot20 pic.twitter.com/WuAUcMZren— FanCode (@FanCode) June 15, 2024
दीपक कुमार महतो बाद झाल्यानंतर मेदिनीपूर विझार्ड्स संघ 20 षटकांत 132 धावांवर गडगडला. हावडा वॉरियर्सच्या डावाची सुरुवात करताना अभिषेक दास मात्र फ्लॉप झाला. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. असे असतानाही वॉरियर्सने 133 धावांचे लक्ष्य पाच गडी राखून पूर्ण केले. आता 11व्या सामन्यात हावडा वॉरियर्सचा सामना मालदा स्मॅशर्सशी होणार आहे. हा सामना 16 जून रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..