दिग्गज मराठी अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याच्या बातम्या सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. मात्र, त्यांच्या पत्नी वृषाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्रम गोखले हे अद्याप जिवंत असल्याचे सांगितले.
माध्यमांशी बोलतांना विक्रम गोखले यांच्या पत्नी म्हणाल्या “तो काल दुपारी कोमात गेला आणि त्यानंतर त्याने स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. तो व्हेंटिलेटरवर आहे. तो सुधारतोय, की अजून प्रतिसाद देत नाही यावर डॉक्टर उद्या सकाळी काय करायचे ते ठरवतील.”
श्रीमती गोखले यांनी खुलासा केला की, विक्रम गोखले 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत. “त्यांच्यात थोडी सुधारणा झाली पण पुन्हा घसरली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. या क्षणी, त्यांना अनेक अवयव काम करत नाहीयेत असंही त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, तिचा नवरा ७७ वर्षांचा आहे, ८२ वर्षांचा नाही. “सॅन फ्रान्सिकोहून माझी एक मुलगी आली आहे. दुसरी इथे मुंबईत राहते.”
लॉकडाऊनच्या काळात विक्रम गोखले मुंबईहून पुण्यात शिफ्ट झाले होते. “त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दोन वर्षांत क्वचितच मुंबईत आले,” विक्रम गोखले यांच्या एका मित्राने हे माध्यमांशी बोलतांना सांगितले. याशिवाय सध्या विक्रम गोखले यांची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याचे बोलले जातंय. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आव्हान त्यांच्या पत्नीने केले आहे.
याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात फोन केला असता त्यानी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे निश्चीतच विक्रम गोखले यांची तब्येत खूपच चिंताजनक असावी..
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…