अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे होते या क्रिकेटरसोबत अफेअर, आपल्या पहिल्याच सामन्यात केला होता विश्वविक्रम..
.
क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नाते खूप जुने आहे. अनेक अभिनेत्र्यांनी क्रिकेटरसोबत लग्न करून आपला संसार सुरु केला आहे तर अनेक अभिनेत्र्या क्रिकेटरसोबत अफेअर मध्ये राहिल्या आहेत. त्यातील काही अभिनेत्र्या ह्या आता अतिशय दिग्गज अभिनेत्र्या बनल्या आहेत. मात्र जेव्हा त्यांचे अफेअर सुरु होते तेव्हा त्या आपल्या करिअरच्या सूरवाती टप्प्यातून जात होत्या.
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा क्रिकेटर पासून दूर राहू शकली नाहीये. असाही एक क्रिकेटर होता ज्याला अभिनेत्री शिल्पा शेट्टीने डेट केले आणि त्याच्यासोबत तिचे अफेअर होते. हे अफेअर जवळपास ३ वर्ष सुरु होते. मात्र त्यांची प्रेम कहाणी लग्नापर्यंत पोहचू शकली नाही.
नक्की कोण होता शिल्पा शेट्टीचे हृद्य चोरणारा क्रिकेटर?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे अफेअर होते ते क्रिकेटर फैज फजल सोबत. सध्या अनेक क्रिकेट चाहत्यांना त्याच नाव जरी माहिती नसले तरीही तो एक चांगला क्रिकेटर होता.
फैज फजलने भारतीय संघासाठी एक वनडे सामना खेळला आहे. फैज फजलने 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. फैझ फझलने वयाच्या 30 वर्षे आणि 282 दिवसात देशासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि त्याच्या पहिल्याच सामन्यात फैजने शानदार फलंदाजी करताना 55 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
फैझ फझल हा आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा भारताचा 14वा खेळाडू ठरला होता. एवढेच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या वयात पदार्पण करणारा फैज देशातील सातवा खेळाडू होता. एकदिवसीय पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा फैज फझल हा तिसरा भारतीय सलामीवीर आहे.
एकेकाळी फैज टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनसोबत डावाची सुरुवात करायचा. शिखर धवन आणि फैज फजल यांनी अंडर-19 विश्वचषकातही डावाची सुरुवात केली आहे. पण नशिबाने साथ दिली नाही आणि फैजला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर व्हावे लागले.
2010 आणि 2011 मध्ये फैज फजल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासोबत खेळताना दिसला. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्सची सह-मालक होती. त्यामुळेच फैजचे शिल्पासोबतचे नाते खूप चांगले होते. राजस्थान रॉयल्सने 10 लाखांच्या मूळ किमतीत फजलला आपल्या संघात समाविष्ट केले, परंतु त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला आपल्या संघात संधी दिली नाही.
फैज फजलची गणना देशांतर्गत क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये केली जाते. 2003 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असलेल्या फैज फजलने 89 सामन्यांत 39.03 च्या सरासरीने एकूण 5894 धावा केल्या आहेत. विदर्भाकडून खेळणाऱ्या फैज फजलच्या नावावर 11 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.
2012 मध्ये फैजने त्याची मैत्रिण तरानासोबत लग्न केले. बीसीसीआयशी संबंधित अनेक दिग्गजही या लग्नात सहभागी झाले होते.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..