- Advertisement -

‘झालेल्या पराभवावर विश्वास बसत नाही’ कोलकत्ताकडून रोमाचांक सामन्यात झालेल्या पराभावर हैद्राबादच्या कर्णधाराने केले अजब वक्तव्य..

0 0

‘झालेल्या पराभवावर विश्वास बसत नाही’ कोलकत्ताकडून रोमाचांक सामन्यात झालेल्या पराभावर हैद्राबादच्या कर्णधाराने केले अजब वक्तव्य..


KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीग (ipl 2023 ) मध्ये, गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात केकेआरने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. हैदराबादचा हा स्पर्धेतील सातवा पराभव ठरला. यानंतर संघाचा कर्णधार एडन मार्कराम खूपच निराश दिसला. आणि पराभवाचे खापर खेळाडूंवर फोडत त्याने अजब वक्तव्य केलं आहे, जे सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

एडन मार्करामने सांगितले पराभवाचे खरे कारण…

कोलकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद काही काळ विजयाच्या अगदी जवळ होते. संघाला 5 षटकात फक्त 38 धावा हव्या होत्या आणि 5 विकेट्सही हातात होत्या. पण केकेआरने जोरदार पुनरागमन करत संघाला 20 षटकांत केवळ 166 धावाच करता आल्या. हे पाहून SRH कॅप्टनला आश्चर्य वाटले.

कर्णधार

सामना संपल्यानंतर कर्णधार एडन मार्कराम म्हणाला – ‘ आम्हाला शेवटच्या षटकांमध्ये चांगले क्रिकेट खेळावे लागले, पण आमची चूक झाली. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. क्लासेनने चांगली फलंदाजी केली, मी सुरुवातीला संघर्ष केला आणि त्यामुळेच आम्ही कमी पडलो. गोलंदाज चांगले होते, फलंदाजांनीही सुरुवात केली तरीही पराभव झाल्याने हा पचवणे तसं कठीणच आहे परंतु आपण त्यातून नक्कीच शिकू आणि पुन्हा विजयाच्या वाटेवर परतू.

प्लेऑफबद्दल तो पुढे म्हणाला की ‘आमचे  बाकी खेळाडू  या ठिकाणी खेळले आहेत त्यामुळे आम्हाला काय अपेक्षित आहे हे माहित आहे. आशा आहे की ,परिस्थिती पाहून आमचा प्रतेक खेळाडू आपल्यातील सर्वोत्तम प्रदर्शन करेल आणि प्लेओफमध्ये जाणाऱ्या ४ संघांपैकी एक आम्ही सुद्धा असू..

 असा झाला सामना..

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत नितीश राणाने 31 चेंडूत 42, रिंकू सिंगने 35 चेंडूत 46 धावा केल्या; च्या मदतीने 9 गडी गमावून 171 धावा केल्या. हैदराबादकडून मार्को जॉन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना एडन मार्करामच्या 40 चेंडूत 41, हेनरिक क्लासेनच्या 36 धावांमुळे सनरायझर्स हैदराबादला केवळ 166 धावा करता आल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी शानदार गोलंदाजी करताना प्रत्येकी दोन बळी घेतले.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.