AFG vs NED: विश्वचषकातील 34 वा सामना आज अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स (AFG vs NED) यांच्यात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करन्यास उतरलेल्या नेदरलँड्स संघाला पहिल्या षटकातच धक्का बसला. यानंतर नेदरलँड्स संघ ठराविक वेळेने विकेट गमावत राहिला..
यासह अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मिस्ट्री स्पिनर मुजीब उर रहमानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण केले आहेत. लखनौ येथे आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 34 व्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या विकेटसह त्याने ही कामगिरी केली. ही कामगिरी करणारा मुजीब अफगाणिस्तानचा चौथा गोलंदाज ठरला आहे.
AFGHANISTAN ARE ON FIRE!
Three wickets in the last three overs 😱
Netherlands slip from 92-2 to 97-5 🤯
LIVE ▶️ https://t.co/q7detsF38A #AFGvNED #CWC23 pic.twitter.com/hfuU1V9dBO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 3, 2023
2017 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुजीबने एकदिवसीय विकेट्सचे शतक पूर्ण करण्यासाठी 73 सामने घेतले आणि दौलत जद्रानची बरोबरी केली. अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये (४४ सामने) सर्वात जलद अशी कामगिरी फक्त राशिद खानने केली आहे. राशिद (१७८), झद्रान (११५) आणि मुजीब यांच्याशिवाय, मोहम्मद नबी (१५७) हा अफगाणिस्तानसाठी १०० हून अधिक एकदिवसीय विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
16 वर्षे आणि 325 दिवसांच्या वयात, मुजीब एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम केला होता, जो अजूनही अबाधित आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी