अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

0
2

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी


भारतात सुरू असलेल्या 2023च्या विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी चाहते स्वारस्य दाखवत नाहीत. भारतीय क्रिकेट संघाचे सामने सोडून इतर कोणत्याही संघाचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेडियमकडे फिरकत नसल्याचे दिसून येते. बहुतांश खुर्च्या रिकाम्या पहायला मिळतात. म्हणून माजी कर्णधार, स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने प्रेक्षक जर सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येत नसतील तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत तिकीट देण्याविषयी सूचना बीसीसीआयला केली होती.

दरम्यान, जास्तीत जास्त प्रेक्षकांना क्रिकेटचे सामने पहावता यावे, यासाठी एक अफगाणिस्तानी युवती पुढे सरसवली आहे. वजमा अय्युबी असे या तरुणीचे नाव आहे. भारतात येण्यापूर्वी तिने क्रिकेटच्या चाहात्याना तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास राहणाऱ्या अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांना तिने हे आवाहन केले होते. ज्या क्रिकेट चाहत्यांना सामना पाहण्यासाठी तिकिटे हवी आहेत त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले होते.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

तरुणीच्या या आवाहनानंतर अनेक अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांनी ती तिला इंस्टाग्राम वरून मेसेज करून तिकिटाची मागणी केली होती. मोफत तिकिटे देण्याच्या तिच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत आणि आभार देखील मानले आहेत.

वजमा अय्युबी ही अफगाणिस्तानी तरुणी भारतात विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी आली आहे. तिला क्रिकेटचे प्रचंड वेड असून ती विराट कोहलीची जबरदस्त फॅन आहे. वजमा अफगाणिस्तानी असूनदेखील भारतीय संघाला सपोर्ट करत असते. वास्तविक पाहता वजमा ही एक बिझनेसमॅन आहे. दुबई तिचा एक मोठा व्यवसाय आहे. यासोबत ती एका एनजीओ सोबत काम करते. सामाजिक कार्याची देखील तिला प्रचंड आवड आहे.

बुधवारी दिल्ली येथे झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने रोहित शर्मा याच्या शतकी खेळाच्या जोरावर स्पर्धेतला सलग दुसरा विजय मिळवला तर अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. विश्वचषकाच्या या स्पर्धेत अफगाणिस्तानी खेळाडू हे फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून येते. अफगाणिस्तानचा फिरकीपटू हुकमी एक्का राशीद खान हा म्हणावा तसा त्याच्या लयित गोलंदाजी करताना दिसून येत नाही. अफगाणिस्तानचा पुढचा सामना शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध दिल्ली येथेच होणार आहे. इंग्लंडच्या संघात सध्या जबरदस्त फॉर्मत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. अन्यथा अफगाणिस्तानी खेळाडूंच्या पदरी निराशा हाती पडेल.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

जगभरात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे भारतात आढळून येतात. कसोटी क्रिकेट असो अथवा एक दिवसीय सामने क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी चाहते नेहमीच स्टेडियमवर गर्दी करतात.भारतात विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा पार पडत असताना चाहत्यांनी पाठ का फिरवली?हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह बीसीसीआय पुढे उभा राहिला आहे. विश्वचषक स्पर्धेतून बीसीसीआयला कोट्यावधी रुपयांची कमाई होणार होती. जर का शेवटपर्यंत अशी स्थिती राहिली तर बीसीसाईला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.


हेही वाचा:

शुभमन गिल नंतर आणखी एका भारतीयला झाली डेंग्यूची लागण; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आली मोठी धक्कादायक बातमी!

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here