PAK vs AFG: बाबर आजमच्या पाकिस्तान संघाला अफगाणिस्ताने पाणी पाजत विक्रमांचा लावला धडाका, एकाच सामन्यात केले 3 मोठे विक्रम..

PAK vs AFG : हिंदीमध्ये एक जुनी म्हण प्रसिद्ध आहे की “मंजिल उन्हीं ही मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।” ही म्हण अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला अगदी फिट बसते. कारण अफगाणिस्तानच्या संघाला मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच 2023 विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठा दुसरा उलटफेटर  करण्यात यशस्वी ठरले आहेत.

अफगाणिस्तानने वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच डिपेंडिंग चॅम्पियन इंग्लंड सारख्या संघाला पराभूत करत नवा इतिहास घडवला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच या संघाने पाकिस्तान संघाचा  (PAK vs AFG  )8 गडी राखून पराभव करत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. तसेच या विजयासह त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे. न्यूझीलंड सारखा संघ देखील अफगाणिस्तान कडून पराभूत होता होता वाचला आहे . अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात अफगाणिस्तानने कोणते विक्रम नावावर केले जाणून घेऊया सविस्तर..

PAK vs AFG

१.एकदिवशीय सामन्यात अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवर पहिला विजय.

अफगाणिस्तानने पाकिस्तानवर वनडे मध्ये मिळवलेला हा पहिला विजय आहे. दोन्ही संघात आतापर्यंत 7 वनडे सामने झाले आहेत. प्रत्येक वेळेस पाकिस्तानच्या संघाने बाजी मारली आहे. मात्र चेन्नईचे चेपॉक मैदान अफगाणिस्तानसाठी लकी ठरले आणि पाकिस्तान विरुद्ध पहिला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

2.अफगाणिस्तानचा पाकिस्तान विरुद्ध खेळताना  लक्षाचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय

अफगाणिस्ताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना  लक्षाचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी 2011 मध्ये झालेल्या सेमी फायनल मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध 274 धावांचे टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केले होते. भारताचा हा विक्रम काल अफगाणिस्ताने मोडीत काढत स्वतःच्या नावे केला.

World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकात या 4 संघाचे नेतृत्व करताहेत यष्टीरक्षक खेळाडू..

पाकिस्तानने अफगाणिस्तान पुढे 283 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान एक षटक आणि आठ गडी राखून यशस्वीरीत्या पार केले. लक्षाचा पाठलाग करत असताना मिळालेला अफगाणिस्तानचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी याच संघाने यु ए ई विरुद्ध खेळताना 2014 मध्ये 274 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पार केले होते.

3.अफगाणिस्तानचा वन डे विश्वचषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या

PAK vs AFG: बाबर आजमच्या पाकिस्तान संघाला अफगाणिस्ताने पाणी पाजत विक्रमांचा लावला धडाका, एकाच सामन्यात केले 3 मोठे विक्रम..

अफगाणिस्तानचा वन डे विश्वचषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना 288 धावा केल्या होत्या. या विजयासह अफगाणिस्तानने गुणतालिकेत चार गुणांसह सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

पाकिस्तानच्या या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघाला फायदा झाला आहे. तसेच पाकिस्तानचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचे सर्व रस्ते अवघड झाले आहेत. गुणतालिकेत देखील सर्वात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान संघाला कोणाच्या तरी पराभवाची आणि नशिबाची साथ हवी आहे तरच हा संघ यंदाच्या स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पोहोचू शकतो.


हेही वाचा: