- Advertisement -

‘आम्ही प्लेऑफच्या लायकही नव्हतो’, आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधार फॅफचे धक्कादायक विधान

0 3

आरसीबीच्या पराभवानंतर त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने अतिशय धक्कादायक विधान केले आहे.

IPL 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात RCB ला गुजरात टायटन्स विरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आरसीबी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये काही आरसीबीचे खेळाडू सोडले तर इतर कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. दरम्यान, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मोठे वक्तव्य केले आहे.

पराभवानंतर फॅफ काय म्हणाला?

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्यांच्या आयपीएल मोहिमेच्या समाप्तीनंतर सांगितले की त्यांचा संघ चालू हंगामातील स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी नाही आणि प्लेऑफमध्ये स्थान घेण्यास पात्र नाही. रविवारी गुजरात टायटन्सकडून 6 गडी राखून पराभव करून आरसीबीची मोहीम संपुष्टात आली. हा सामना जिंकण्यात संघाला यश आले असते तर मुंबई इंडियन्सऐवजी प्लेऑफसाठी पात्र ठरले असते.

 

आरसीबी संघाने आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा डू प्लेसिस आहे. खूप प्रयत्न करूनही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. डु प्लेसिस म्हणाला की, आमचा हंगाम येथे संपल्याने मी खूप निराश आहे. आमच्या कामगिरीबाबत प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक नव्हतो.

 

तो म्हणाला की संपूर्ण हंगामात काही उत्कृष्ट कामगिरी पाहण्यास आम्ही भाग्यवान आहोत. एक संघ म्हणून किंवा एकूण 14-15 सामने पाहिल्यास, आमची कामगिरी प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेशी नव्हती. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने विजयासाठी 198 धावांचे लक्ष्य पाच चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. याआधी विराट कोहलीनेही याच सामन्यात शतक झळकावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.