ENGvsAFG: अफगाणिस्तानच्या विजयात भारताच्या प्रिन्सचा हात; पडद्याच्या पाठीमागे राहून दिला विजयाचा मंत्र!

ENGvsAFG: अफगाणिस्तानच्या विजयात भारताच्या प्रिन्सचा हात; पडद्याच्या पाठीमागे राहून दिला विजयाचा मंत्र!

 

ENGvsAFG: रविवारी दिल्लीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात 2019 सालच्या गतविजेता इंग्लंड संघाला अफगाणिस्तानच्या युवा संघाने 69 धावांनी धूळ चारली. यंदाच्या विश्वचषकातला अत्यंत रोमहर्षक सामना क्रिकेट रसिकांना पाहता आला. एका चॅम्पियन संघाला पराभूत केल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या संघाला तब्बल आठ वर्षानंतर विजय विजय मिळाला आहे. या विजया पाठीमागे भारतीय कनेक्शन जोडले जात आहे.

ENGvsAFG: अफगाणिस्तानच्या विजयात भारतीय खेळाडूचे योगदान, पडद्यामागून बजावली कामगिरी..

अफगाणिस्तानच्या या विजयात भारताचा प्रिन्स म्हणजेच माजी खेळाडू अजय जडेजा याचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. त्याचे झाले असे की, ऐन विश्वचषक तोंडावर असताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटस्तराचा अपार अनुभव असलेल्या 52 वर्षीय अजय जडेजा याची मेंटर म्हणून नियुक्ती केली आणि संघाचे भाग्य उजळून गेले.

ENGvsAFG: अफगाणिस्तानच्या विजयात भारताच्या प्रिन्सचा हात;  पडद्याच्या पाठीमागे राहून दिला विजयाचा मंत्र!

विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाला समोर झालेल्या संघाने जबरदस्त कमबॅक करत इंग्लंड विरुद्ध विजय मिळवला. जडेजा गेल्या महिनाभरापासून अफगाणिस्तानच्या संघाला क्रिकेटमधले बारकावे शिकवित आहे. संघाच्या विजयामध्ये प्रशिक्षकांचा जितका हात असतो तितकाच एखाद्या मेंटरचा देखील असतो. मेंटर हा प्रत्येक खेळाडूंसोबत काम करत असतो.

अफगाणिस्तानला विजयाचा रस्ता दाखवणाऱ्या अजय जडेजाची क्रिकेट कारकीर्द देखील जबरदस्त आहे. अजय जडेजांनी त्याच्या क्रिकेटकारकिर्दीत बहुतांश आंतरराष्ट्रीय सामने हे कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन च्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. अझरुद्दीन संघात नसताना जडेजाने 13 सामन्यात संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळला. त्याने 196 एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने 37.47 च्या सरासरीने 5359 धावा काढल्या. सुपरहिट 6 शतकांचा तर 30 अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये फेल गेला. तो केवळ 15 कसोटी सामने खेळू शकला यात त्याच्या नावावर 576 धावांची नोंद आहे. तसेच त्याच्या नावावर 20 आंतरराष्ट्रीय विकेटचीदेखील नोंद आहे.

मुजिब उर रहमान ENGvsAFG:

1996 साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत जडेजाने पाकिस्तान विरुद्ध खेळलेली 25 चेंडूत 45 धावांची छोटी इनिंग आजही करोडो क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. त्याने भल्या-भल्या बोलत फलंदाजाची बोलती बंद करणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनिस याला धु-धु धुतले. त्याच्या एकाच षटकात 23 धावा चोपल्या.

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह याने देखील अजय जडेजा यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. तो म्हणाला की, जडेजा यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये बरेच बारकावे शिकवत आहेत. तसेच आम्हाला ते मानसिक दृष्ट्या सक्षम बनवत आहेत. विरोधी संघाने टाकलेल्या दबावांमध्ये आपण कसे स्थिर राहून आपले मनोबल वाढवायचे यावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी