MUM vs HYB LIVE: 25 चौकार, 3 षटकार… आयपीएल लीलावाआधी अजिंक्य रहाणे फोर्ममध्ये, रणजी ट्रॉफीमध्ये ठोकले शानदार दुहेरी शतक, आयपीएलमध्ये लागू शकते मोठी बोली..
सध्या देशभरात रणजी ट्रॉफीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. काल रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना सुरु झाला होता. ज्यात पहिल्या दिवशी फलंदाजी करतांना मुंबईने 475 धावा काढल्या, यासाठी त्यांनी 3 गडी गमावले होते.
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात जबरदस्त फोर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या दिवशी रहाणे ने 147 धावा काढल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा अजिंक्य राहणे आणि सर्फराज खान यांनी पुन्हा डावाची सुरवात केली. यानंतर जबरदस्त फलंदाजी करत अजिंक्य रहाणे ने आपले दुहेरी अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने 253 चेंडू खेळले.

आपल्या या खेळीमध्ये अजिंक्य रहाणेने तब्बल 25 चौकार आणि 3 जबरदस्त षटकार ठोकलेत. रहाणे आजूनही क्रीजवर उभा आहे आणि आपल्या जबरदस्त फलंदाजीने आपलं नाव सिद्ध करून दाखवत आहे.
मुंबई कडून सर्फराज सुद्धा आपल्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. मुंबईच्या सर्वच फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत संघालाएका मोठ्या धावसंखेकडे नेले आहे. मुंबई सध्या 3गडी बाद 563 धावांवर खेळत असून मुंबईची फलंदाजी आजूनसुद्धा लांब आहे. कर्णधार अजिंक्य राहणे नाबाद 204 तर सर्फराज खान नाबाद 84 धावावर खेळत आहेत.
या दोघांच्या फलंदाजीने मुंबई एका मोठ्या धावसंखेकडे वाटचाल करतांना दिसून येत आहे.
अजिंक्यचा फोर्म पाहता आयपीएल लिलावात लागू शकते मोठी बोली.
लवकरच आयपीएल 2023 च्या मिनी लिलावाला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणे ने खेळलेली नाबाद 200 धावांची ही खेळी त्याच्यावर बोली लावणाऱ्या संघाची संख्या वाढवू शकते. आयपीएल लिलावात त्याच्या या खेळीचा चांगला फायदा रहाणेला होऊ शकतो.