- Advertisement -

अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी स्वतः धोनीने दिला होता खास सल्ला; चेन्नई सुपर किंग्सच्या मालकाने केला मोठा खुलासा..!

0 28

अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी स्वतः धोनीने दिला होता खास सल्ला; चेन्नई सुपर किंग्सच्या मालकाने केला मोठा खुलासा..!


चेन्नई सुपर किंग्स चा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) IPL 2023 मध्ये आपल्या चमकदार कामगिरीने सिद्ध केले की, तो T20 मध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याच्या टुकटुक फलंदाजीवर क्रिकेट तज्ज्ञांनी नेहमीच शंका घेतली होती. पण अजिंक्यने (Ajinkya Rahane) या हंगामात आपला चमकदार खेळ दाखवून त्याने टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.

महत्वाचे म्हणजे या हंगामात चेन्नई ने (CSK) ने फक्त 50 लाख रुपये खर्च करून रहाणेला (Ajinkya Rahane) आपल्या संघाचा भाग बनवले आहे. अजिंक्य रहाणेला संघाचा भाग बनवण्यासाठी एमएस धोनीने (Ms Dhoni) मोठी चाल केली होती, ज्याचा खुलासा खुद्द सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन (Kasi Vishvnathan) यांनी केला आहे. नक्की काय म्हणाले चेन्नईने मालक जाणून घेऊया अगदी सविस्तर…

अजिंक्य रहाणे

आयपीएल 2023 च्या आधी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)त्याच्या संथ फलंदाजीसाठी ओळखला जात होता. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही रहाणेला काही विशेष कामगिरी करता आली नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 8 डावात त्याने केवळ 112 धावा केल्या. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 34 होती. त्यानंतर कोणत्याही संघाने रहाणेवर दावा केला नाही परंतु CSK ने त्याला आपल्या संघाचा एक भाग बनवले आणि रहाणेने देखील आपल्या फ्रेंचायझीला निराश केले नाही. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याचे श्रेय एमएस धोनीला दिले आहे.

 CSK CEO ने बोलताना अजिंक्य रहाणेचा संघात समावेश केल्याचे श्रेय एमएस धोनीला दिले.

“एमएस धोनीने मला सांगितले की, तुम्हाला ज्या खेळाडूवर बोली लावायची आहे त्यावर लावा, त्यामुळेच आम्ही रहाणेवर बोली लावली आणि त्याला संघात समाविष्ट केले.

विशेष म्हणजे, अजिंक्य रहाणेमध्ये कोणत्याही फ्रँचायझीला रस नव्हता, सीएसकेसाठी त्याला कमी किंमतीत खरेदी करणे सोपे होते. रहाणेनेही शानदार खेळ दाखवत आपल्या फ्रँचायझीचा विश्वास जिंकला.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane)आतापर्यंत खेळलेल्या जवळपास सर्वच सामन्यांमध्ये खूप प्रभाव पाडला आहे. रहाणेने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यात 224 धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने या मोसमात 189.83 च्या सरासरीने 224 धावा केल्या आहेत.

IPL कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर रहाणेने(Ajinkya Rahane) 164 सामन्यात 31 च्या सरासरीने 4298 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 2 शतके आणि 30 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची चमकदार कामगिरी पाहून बीसीसीआयने त्याला डब्ल्यूटीसी संघाचा भाग बनवले आहे.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.