प्रामुख्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.
क्रिकेटर म्हटल की पैसा आणि प्रसिद्धी ही आलीच. आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि पैसा मिळतो.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेल क्रिकेट मधून वर्षाला किती कमवतो आणि एकूण किती संपत्ती चा मालक आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अक्षर पटेल हा भारतीय क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे, अक्षर पटेल ने अत्यंत कमी वेळात खूप यश संपादन केले आहे. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात 7 विकेट घेत खळबळ उडवून दिली. परंतु तुम्हाला माहिती आहे का की अत्यंत कमी वेळेत अक्षर पटेल ने किती पैसे कमवलेत ते?

भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू अक्षर पटेल याचे वय अवघे 29 वर्ष आहे. अक्षर पटेल चा जन्म हा गुजरातमधील नडियाद येथे झाला. अक्षर पटेलच्या वडिलांचे नाव राजेश पटेल आणि आईचे नाव प्रीती पटेल असे आहे. अक्षर पटेल ला लहानपापासूनच क्रिकेट ची आवड होती म्हणून अक्षर पटेल ने क्रिकेट मधेच आपले करियर केले.
तसेच अक्षर पटेल च्या संपत्ती बद्दल सांगायचे झाले तर अक्षर पटेल ची एकूण संपत्ती ही $5 दशलक्ष आहे. म्हणजे भारतीय चलनात सुमारे 39 कोटी रुपये एवढी आहे. अक्षर पटेल ने क्रिकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमवला आहे. तसेच बीसीसीआयकडून अक्षर पटेल ला वार्षिक एक कोटी रुपये एवढा पगार मिळतो. याशिवाय तो आयपीएल मध्ये खेळूनही भरपूर पैसा कमावतो.
अक्षर पटेलला आयपीएल २०२२ मध्ये खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने संपूर्ण ९ कोटी रुपये दिले होते. अक्षर पटेलने आयपीएलमधूनच 10 वर्षात 33 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दिवसेंदिवस या संपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.