हार्दिक पंड्याचा रिप्लेसमेंट मिळाला..! विश्वचषकादरम्यान फिट झाला भारताचा ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू; सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीत ठोकले दमदार अर्धशतक

हार्दिक पंड्या: बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली. त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. याच दरम्यान भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा फिट झाला आहे. सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीत दमदार कामगिरी करत तो फिट असल्याचे दाखवून दिले आहे.

हार्दिक पंड्याचा रिप्लेसमेंट मिळाला..! विश्वचषकादरम्यान फिट झाला भारताचा 'हा' स्टार अष्टपैलू खेळाडू; सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीत ठोकले दमदार अर्धशतक

आयसीसी 2023 विश्वचषकसारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला त्यामुळे पहिल्यांदा त्याचे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न ही भंगले. अक्षर पटेल हा संघाबाहेर होताच आपसूकपणे आर. अश्विनची संघात एन्ट्री झाली. 

गेल्या वर्षभरापासून अक्षर पटेलने भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. यासह त्याने रवींद्र जडेजाची कमतरता भासू दिली नाही.

नुकतेच हार्दिक पंड्या अनफिट झाल्यामुळे त्याच्या जागी कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता अक्षर पटेल फिट झाल्याने चर्चेंना पूर्णविराम मिळतोय. हार्दिक पंड्या पुढच्या सामन्यात खेळू शकला नसेल तर राखीव खेळाडू म्हणून अक्षर पटेलला संधी मिळण्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. पंड्या स्पर्धेतून बाहेर पडला तर अक्षर पटेलला वर्ल्ड कप चे तिकीट मिळू शकते.

हार्दिक पंड्याचा रिप्लेसमेंट मिळाला..! विश्वचषकादरम्यान फिट झाला भारताचा 'हा' स्टार अष्टपैलू खेळाडू; सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीत ठोकले दमदार अर्धशतक

सय्यद मुस्ताक अली T20 ट्रॉफी मध्ये गुजरात आणि पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यांमध्ये पंजाबचा तडफदार फलंदाज अभिषेक शर्मा याने 56 चेंडू तडाखेबाज शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर पंजाबने 234 धावांचे आव्हान गुजरात पुढे ठेवले. प्रत्युत्तरत गुजरातने देखील दमदार सुरुवात केली. चिरागने 42 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज इनिंग खेळली. अक्षर पटेलने देखील तीन चौकार आणि चार उत्तुंग षटकारांसह 27 चेंडूत 52 धावांची मोठी खेळी केली.

विश्वचषक स्पर्धेत भारताचा पुढचा सामना 29 ऑक्टोबर रोजी गतविजेता इंग्लंड सोबत होणार आहे. या सामन्यात पंड्याच्या जागी कुणाला खेळवण्यात येणार याबाबतची कोणतीही माहिती बीसीसीआयकडून आली नाही. मागील सामन्यात सूर्यकुमार यादव याला पंड्याच्या जागी स्थान देण्यात आले होते.


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *