इंग्लंडचा आक्रमक फलंदाज ॲलेक्स हेल्स (Alex Hales) आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत त्याने इंग्लंड संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने जोस बटलर सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत १० गडी राखून विजय मिळवून दिला होता. आता यूएईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी -२० लीग स्पर्धेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळत आहे. तो या टी -२० लीग स्पर्धेत शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने एकाच षटकात ५५ धावा कुटण्याचा पराक्रम देखील केला आहे. त्याने देशांतर्गत झालेल्या एका क्रिकेट सामन्यात हा पराक्रम केला होता.
ॲलेक्स हेल्स बद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या टी -२० लीग स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये ११९ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. तो या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करत आहे. तर आतापर्यंत ४८ वेळेस त्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला आहे. तो आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र काही वैयक्तिक कारणास्तव त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. अन्यथा कोलकाता नाईट रायडर्स संघाला ॲलेक्स हेल्सने चांगली सुरुवात करून दिली असती.
९९ धावांवर झाला बाद..
डेसर्ट वायपर्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या ॲलेक्स हेल्सने गल्फ जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ९९ धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. केवळ १ धावेमुळे त्याचे शतक हुकले. यापूर्वी झालेल्या ३ सामन्यांमध्ये त्याने ८३, ६४ आणि ११० धावांची खेळी केली होती. तसेच पॉइंट्स टेबल बद्दल सांगायचं झालं तर, ॲलेक्स हेल्सचा संघ आता दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण