Cricket Newsक्रीडावर्ल्डकप 2023

IND vs BAN: पाकिस्तानला चारीमुंड्या चित करून रोहित शर्माची सेना पुण्यात दाखल: विजय चौकारासाठी भारत सज्ज..

 

IND vs BAN: रविवारी(14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या संघाला हरवून भारतीय संघ पुण्यात विमानाने दाखल झाला आहे. पुढचे चार दिवस भारतीय संघ पुण्यात मुक्कामी असेल. चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद ते पुणे असा चार शहरांचा प्रवास करून खेळाडू आपल्या कुटुंबासह पुण्यात विमानाने दाखल झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी चाहत्यांनी  विमानतळावर एकच गर्दी केली होती. संघातील सर्वच खेळाडू विमानतळावर दाखल झाल्यानंतर थेट हॉटेलमध्ये गेले.

विश्वचषक स्पर्धेतील 17 वा सामना 19 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश (IND vs BAN:) यांच्यामध्ये पुण्याच्या गहुंजे स्टेडियम येथील मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघात आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. भारतीय संघाने दोन विजय तर बांगलादेशच्या संघाला एक विजय मिळवता आला आहे.

world cup 2023: किती सामने जिंकल्यावर भारत पोहचू शकतो विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये: वाचा ही महत्त्वपूर्ण बातमी!

IND vs BAN: हेड टू हेड

दोन्ही संघाच्या एक दिवशीय आकडेवारीवर नजर टाकले असता दोन्ही संघात 40 सामने झाले आहेत. यात भारताने 31 तर बांगलादेश ने 8वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. भारतीय गोलंदाज आणि फलंदाज दोघेही फार्मात आहेत. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सामन्यात रोहितच्या सेनेचे पारडे जड वाटत आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना हरवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तीन विजयासह भारताचे सहा गुण झाले आहेत. सेमी फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी भारतीय संघाला एकूण सात सामने जिंकायचे आहेत. भारताने यापूर्वीच तीन सामने जिंकलेत. भारताला आणखीन चार सामने जिंकण्याची गरज आहे.

भारतीय संघाने सहा सामने जिंकले तरी तो टॉप 4 मध्ये येऊ शकतो. मागील विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी पाच सामने जिंकलेल्या संघदेखील सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाचे प्रत्येकी 11-11 गुण झाले होते, मात्र नेट रन रेटच्या हिशोबानुसार न्यूझीलंडने सेमी फायनल मध्ये धडक मारले.

IND vs BAN:

भारताचे पुढील सामने बांगलादेश, इंग्लंड, साउथ आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड आणि न्यूझीलंड या संघासोबत होणार आहेत. मागील आकडेवारीनुसार, न्यूझीलंड वगळता इतर संघासोबत होणारे सामने भारताला जड जाणार नाहीत. न्युझीलँड असा एकमेव संघ आहे जो की भारताला प्रत्येक वेळेस विश्वचषकात जड गेलेला आहे. न्यूझीलंड विरुद्धचा पेपर सोपा गेला तर भारताला विश्वचषक जिंकणापासून कोणताच संघ रोखू शकणार नाही. यंदाचा विश्वचषक हा भारतात होत असल्यामुळे भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची संधी चालून आली आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button