Who is Yashasvi Jiawal’s Girlfriend Maddie Hamilton? सध्या भारतीय संघाचा युवा क्रिकेटर यशस्वी जैस्वाल मैदानावर जबरदस्त फोर्ममध्ये आहे. ऑस्ट्रोलियाविरुद्ध तो जबरदस्त धावा काढतोय. त्याच्या मैदानी कामगिरी व्यतिरिक्त यशस्वी सध्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.
होय, सध्या यशस्वी जैस्वालचे एका मुलीसोबत काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये केलेल्या दाव्यानुसार ती मुलगी यशस्वीची गर्लफ्रेड आहे. यशस्वीने स्वत: अद्याप याबद्दल आपल्या बाजूने असा कोणताही दावा केला नसला, तरी मीडियातील चर्चेच्या आधारे यशस्वीची गर्लफ्रेंड एक इंग्लिश मुलगी आहे. कोण आहे ही मुलगी जाणून घेऊया सविस्तर?
कोण आहे यशस्वी जैस्वालची गर्लफ्रेंड ? (Who is Yashasvi Jaiswal’s Girlfriend Maddie Hamilton ?
यशस्वी जैस्वालच्या गर्लफ्रेंडच नाव आहे मॅडी हॅमिल्टन( Maddie Hamilton):आता प्रश्न असा आहे की हे कोण आहे आणि या दोघांची प्रेम कहाणी (Yashasvi jaiwal and Maddie Hamilton love story) सुरु कशी आणि कुठून झाली ?
मॅडीबद्दल कोणतीही वैयक्तिक माहिती सध्या उपलब्ध नाही. माहिती एवढीच की ती ब्रिटन ची असून सध्या कोलेजमध्ये शिकते आहे. यशस्वी फलंदाजी करताना ती अनेक वेळा मैदानात स्टेडियममध्ये उपस्थित होते, विशेषतः फलंदाजी करताना आणि प्रत्येक चांगल्या फटक्यांवर ती सर्वांपेक्षा जास्त खुश दिसते आणि यशस्वी सुद्धा हे मैदानातून नोटीस करतो.
View this post on Instagram
यशस्वी जैस्वालला खेळतांना पाहण्यासाठी मॅडी भारतात सुद्धा अनेकदा येते.
या वर्षाच्या सुरुवातीला, हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या भव्य स्टँडमध्ये भारत-इंग्लंड ((IND vs ENG)पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मॅडीची उपस्थिती होती. यावेळेस ती यशस्वीच्या नावाने चिअर्स देखील करत होती.
कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काही इंग्लिश मुलींनी टीम इंडियाची जर्सी घातली होती आणि त्या मुलींपैकी एक मॅडी हॅमिल्टन होती. ब्रिटीश मीडियामध्येही या फोटोची जोरदार चर्चा झाली.
ती आयपीएल 2024 च्या हंगामात देखील उपस्थित होती आणि अनेक सामन्यांमध्ये ती राजस्थान रॉयल्स संघासाठी चीअर करताना दिसली. फक्त हा संघ का? त्यामुळे यशस्वीसोबतच्या तिच्या जवळच्या नात्याच्या अफवांना उधाण आले. शिवाय आयपीएल 2024 मधून राजस्थान रॉयल्सच्या बाहेर पडल्यानंतर चेन्नई विमानतळावर ही जोडी एकत्र दिसली होती.
यशस्वी जैस्वालने #Family लिहून सोशल मिडीयावर दोघांचे सोबत फोटो केलेत शेअर.
याआधीही यशस्वी जयस्वाल यांनी स्वत: दोन महिलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यापैकी एक मॅडी होती आणि दुसरी कदाचित तिची आई होती आणि तिला #Family टॅग केले होते. तेव्हापासून, मॅडी हॅमिल्टनचा उल्लेख यशस्वीची मैत्रीण म्हणून करण्यात आला परंतु दोघांनीही एकमेकांशी संभाव्य संबंध असल्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली नाही.
आजकाल, भारतीय फलंदाजी सुपरस्टार यशस्वी आणि मॅडी हॅमिल्टनचा भाऊ हेन्री हॅमिल्टन यांची एक रील देखील इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हैदराबाद कसोटीत, जिथे मॅडी ग्रँडस्टँडमध्ये दिसला होता, यशस्वीने पहिल्या डावात 80 झटपट धावा केल्या आणि भारताची धावसंख्या 436 झाली. दुसऱ्या डावात केवळ 15 धावा झाल्या आणि भारताचा कसोटी पराभव झाला. यशस्वी जैस्वाल आणि त्याची गर्लफ्रेंड लवकरची दोघांच्या प्रेमाला दुजोरा देतील अस म्हटल जात आहे.