आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात यामध्ये कब्बडी, कुस्ती, खो खो, हॉकी परंतु आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट चे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात.
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तर देशातील सर्वाधिक लोकांची पसंती ही क्रिकेट खेळला आहे. क्रिकेट मध्ये अनेक वेगवेगळी रेकॉर्ड बनली आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त कॅच, सर्वात मोठा स्कोअर इत्यादी रेकॉर्ड तुम्ही वाचले किंवा बघितले असतील.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या संघाबद्दल सांगणार आहे तो संघ चक्क तीन वेळा शून्य धावांवर बाद झाला होता. तर जाणून घेऊया नक्की काय प्रकार घडला होता.
क्रिकेट खेळात क्षणार्धात डाव बदलतो हे आपल्याला माहीतच आहे. 2016 मध्ये इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये क्राइस्ट चर्च विद्यापीठाने बुपचाइल्ड क्लबला विजयासाठी 221 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु नशीब खराब असल्यावर कोणीच आणि कोणतीच टीम काहीही करू शकत नाही.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या संघातील चक्क 9 खेळाडू हे चक्क झीरो रण काढून आऊट झाले. अत्यंत लज्जास्पद हा सामना झाला होता. संघाची लाज वाचवण्यासाठी शेवटच्या खेळाडूला 1 धाव काढून संघाची इज्जत वाचवायला सांगितली होती. परंतु नशीब एवढे खराब की शेवटचा खेळाडू सुद्धा झीरो वरच आऊट झाला. आणि एकंदरीत फक्त 20 बॉल मध्ये संपूर्ण संघ ऑल आऊट झाला.

साल 1964 मध्ये सॉल्टवुड क्रिकेट क्लबने मार्टिन वॉल्टर क्लबला 216 धावांचे लक्ष्य दिले होते. मार्टिन वॉल्टर क्लबचा संपूर्ण संघ शून्य धावांवर बाद झाला.
आता क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं कधी झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की साल 1913 मध्ये, ग्लास्टनबरीविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लँगपोर्ट संघाबाबतही अशीच लाजस्पद परिस्थिती झाली होती. अवघ्या झीरो धावांवर संपूर्ण संघ बाद झाला होता.