बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी मुंबईचे माजी खेळाडू अमोल मुजुमदार यांची नियुक्ती केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट मधला दांडगा अनुभव असलेले मुजुमदार यांनी महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी जुलैमध्ये मुलाखात दिले होते. बीसीसीआयच्या 3 सदस्यीय समितीने त्यांची मुलाखत घेतली होती. मुजुमदार यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. अखेर बुधवारी बीसीसीआयने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
तीन सदस्याच्या या समितीमध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश होता. या पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. अखेर मुजुमदार यांची वर्णी लागली. रमेश पवार यांच्या नंतर तात्पुरत्या स्वरूपावर बीसीसीआयने ऋषिकेश कानिटकर यांची नियुक्ती केली होती. आता कानिटकर यांच्या जागी अमोल मुजुमदार हे कायमस्वरूपी काम पाहतील. तर ऋषिकेश कानिटकर हे एनसीए मध्ये अंडर 19 भारतीय पुरुष संघाला मार्गदर्शन करतील.
अमोल मुजुमदार यांच्याकडे 171 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी जवळपास 11,167 धावा काढल्या. या 30 शतक ठोकली आहेत. आठ वेळा मुंबईच्या संघाला रणजी चॅम्पियन बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जवळपास पंधरा वर्षे त्यांनी मुंबईच्या संघाकडून खेळाला आहे. 2009 मध्ये त्याने आसाम राज्याकडून खेळाला आहे.
2021 मध्ये मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा त्यांच्यावरती येऊन ठेपितांच्या स्मारक दर्शनाखाली मुंबईचा संघ हा 2021- 22 मध्ये उपविजेता ठरला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबईच्या संघाने मागील वर्षी सय्यद मुस्ताक अली टी 20 स्पर्धा जिंकली होती. 21 वर्ष रणजी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या या खेळाडूला मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. भारताच्या 19 वर्षाखालील संघामध्ये तो सर्व गांगुली, राहुल द्रविड यांच्यासोबत खेळला होता.
प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर अमोल मुजुमदार यांनी ट्विटर द्वारे बीसीसीआयचे आभार मानले. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल मला अत्यंत आनंद झाला आहे. माझ्यावर आणि टीम इंडियासाठी असलेल्या माझ्या व्हिजनवर विश्वास ठेवल्याबद्दल मी CAC आणि BCCI चे आभार मानतो.