“पैसा बोलता है…” धोनी, रोहित ते हार्दिक पांड्या..!अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-विडींग साठी जमले सर्व मोठमोठे क्रिकेटर,यादीमध्ये विदेशी दिग्गज खेळाडूही सहभागी.

"पैसा बोलता है..." धोनी, रोहित ते हार्दिक पांड्या..!अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-विडींग साठी जमले सर्व मोठमोठे क्रिकेटर,यादीमध्ये विदेशी दिग्गज खेळाडूही सहभागी.

Anant ambani radhika merchant pre weeding: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा (Pre weeding)  आजपासून गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू होणार आहे. अंबानी कुटुंबाच्या या ग्रँड प्रिक्स विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलीवूड स्टार्ससह भारतीय क्रिकेटर्सही दाखल होत आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकरसह अनेक भारतीय खेळाडू या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. हा ग्रँड प्रिक्स विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत.

चला तर पाहूया या शाही विवाह सोहळ्यास आतापर्यंत कोणकोणते क्रिकेटर आले आहेत आणि आणखी कोणते क्रिकेटर हजेरी लावणार आहेत.

Anant-Radhika Pre Wedding Event: जामनगर में 1-3 मार्च को होगा भव्य समारोह, अंबानी परिवार की इवेंट लिस्ट में शामिल हैं ये खास प्रोग्राम | Moneycontrol Hindi

महेंद्रसिंग धोनी आणि झहीर खान

भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्रिक्स विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गुजरातमधील जामनगरला पोहोचला आहे. धोनी येथे पत्नी साक्षीसोबत पोज देताना दिसला. भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानही पत्नी सागरिका घाटगेसोबत या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. झहीर खान मुंबई इंडियन्स संघाशी बऱ्याच काळापासून जोडला गेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sports Villa (@sportsvillafg)

कर्णधार रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही अंबानी कुटुंबाच्या ग्रँड प्रिक्स वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे पोहोचला आहे. रोहित शर्मा दीर्घकाळापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेहसोबत येथे पोहोचला आहे.   रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र, या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे.

हार्दिक पांड्या  -ईशान किशन

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि झहीर खान यांच्यासोबत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याही या ग्रँड प्रिक्स वेडिंग सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. हार्दिक पांड्या त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्यासोबत विमानतळावर दिसला. तर इशान किशनही अंबानी कुटुंबाच्या या ग्रँड प्रिक्स विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. त्याला विमानतळावरही स्पॉट करण्यात आले आहे.

"पैसा बोलता है..." धोनी, रोहित ते हार्दिक पांड्या..!अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-विडींग साठी जमले सर्व मोठमोठे क्रिकेटर,यादीमध्ये विदेशी दिग्गज खेळाडूही सहभागी.

 

हार्दिक पांड्या आणि इशान किशन व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा आणखी एक स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव देखील अनंत अंबानींच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सूर्यकुमार यादव पत्नी देविशा शेट्टीसोबत विमानतळावर दिसला. यावेळी त्यांच्यासोबत झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगेही उपस्थित होते.

परदेशी खेळाडूंचाही समावेश

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

अंबानी कुटुंबाच्या ग्रँड प्रिक्स विवाह सोहळ्यासाठी भारतीय खेळाडू सोबतच  परदेशी खेळाडूंही सामील होण्यासाठी गुजरातमधील जामनगरला पोहोचले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. याशिवाय अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानही अंबानी कुटुंबाचा पाहुणा म्हणून गुजरातमधील जामनगरला पोहोचला. त्याने सूर्यकुमार यादवसोबत कॅमेरामनला भरपूर पोज दिल्या आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड (anant ambani radhika merchant) यांचाप्हरी विडींग सोहळा सोहळा 3 दिवस चालणार आहे तर त्यांच्या लग्नाची तारीख ही 12 जुलै आहे.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.

T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान सामन्याबाबत या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *