आयपीएलच्या आधीच आंद्रे रसेलने मैदानावर आणले तुफान, जबरदस्त फलंदाजी करत ठोकला स्पर्धेतील सर्वांत लांब षटकार,चेंडू थेट मैदानच्या बाहेर, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले ‘मजा आ गया’ पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ..
बिग बॅश लीगचा 10 वा सामना मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात आज म्हणजेच 21 डिसेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात मेलबर्न संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. तत्पूर्वी, कॅरेबियन संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. 8 धावांच्या स्कोअरवर 3 विकेट्स गमावल्यानंतर क्रीझवर आलेला रसेल गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवताना दिसला. . या खेळीदरम्यान रसेलने एक लांबलचक षटकारही मारला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आंद्रे रसेलने या मोसमातील सर्वात लांब षटकार ठोकला.
बिग-बॅश लीगच्या 10व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळताना आंद्रे रसेलने हीटविरुद्ध शानदार खेळी केली. येताच त्याने मैदानाभोवती षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. रसेलने धडाकेबाज फलंदाजी करताना मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले.

यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या डावातील 9व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रसेलने ब्रिस्बेनचा वेगवान गोलंदाज जेम्स बीसलीला लांब षटकार ठोकला. हा षटकार 103 मीटर अंतरावर पडला. त्याच्या या षटकाराने खळबळ उडाली आहे. रसेलचा हा मोसमातील सर्वात मोठा षटकार होता
ब्रिस्बेन हीट संघाने मेलबर्नसमोर 20 षटकांत 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना रेनेगेड्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे तीन फलंदाज 10 पेक्षा कमी धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये गेले. नंतर क्रीजवर आलेल्या रसेलने (आंद्रे रसेल) आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांची कसोटी पाहिली.
त्याने 42 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 6 आकाशी षटकारांचा समावेश होता. मेलबर्नने 4 चेंडू शिल्लक असताना 4 गडी राखून सामना जिंकला. त्याच्याशिवाय फिंचने 43 चेंडूत 31 धावांची झुंजार खेळी खेळली. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि एका चौकाराचाही समावेश होता.
पहा व्हायरल व्हिडीओ.
Andre Russell showing his muscle power 💪🔥#BBL #BigBash #AndreRussell #IPL #KKRpic.twitter.com/v9OZqUKcmX
— CRICKETNMORE (@cricketnmore) December 21, 2022