हा तर खेळभावनेचा अपमान..! अँजेलो मॅथ्यूजला टाईम आउट बाद केल्यानंतर शकीब अल हसनवर भडकले लोक, सोशल मिडीयावर केल जातंय तुफान ट्रोल..

हा तर खेळभावनेचा अपमान..! अँजेलो मॅथ्यूजला टाईम आउट बाद केल्यानंतर शकीब अल हसनवर भडकले लोक, सोशल मिडीयावर केल जातंय तुफान ट्रोल..

 शकीब अल हसन:  विश्वचषक 2023 चा 38 वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना बांग्लादेशने 3 विकेट राखून जिंकला. मात्र या सामन्यात विजयी झालेल्या संघापेक्षा हरलेल्या संघातील एका खेळाडूची जास्त चर्चा होतेय.

  क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी अशी एक घटना या सामन्यात पाहायला मिळाली. या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी उशिरा मैदानात पोहोचला, त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने पंचांना त्याला आऊट करण्यासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सोशल मीडियावर चाहते शाकिब आणि या घटनेबाबत सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

SL vs BAN: Timeout rule... एकही चेंडू न खेळता बाद झाला अँजेलो मॅथ्यूज तो नियम नक्की काय आहे ? पहिल्यांदा एक खेळाडू ठरलाय टाइमआउटचा बळी..

बहुतांश क्रिकेट चाहत्यांना शाकीबचा हा प्रताप आवडलेला नाहीये. भलेही तो नियमामध्ये बसतो मात्र अँजेलो मॅथ्यूजने दिलेले कारणही तेवढेच वैध्य होते म्हणून पंचानी त्याला शकीब अल हसनला अपील मागे घेण्याचे आव्हान करण्यासाठी संधी देखील दिली. मात्र त्याचा फारसा परिणाम शाकीबवर झाला नाही आणि तो आपल्या आपलीवर कायम राहिला.

शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजला टाईम आउट करण्याची आपली केली, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असी घटना..

विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) यांच्यात खेळल्या गेलेल्या  सामन्यात, बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनच्या चेंडूवर श्रीलंकेची फलंदाज सदीरा समरविक्रमा बाद झाला. त्यानंतर त्याच्या जागी श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला,मात्र हेल्मेट ला काहीतरी अडचण असल्यामुळे त्याला मैदानात पोहोचायला उशीर झाला होता.

 हा तर खेळभावनेचा अपमान..! अँजेलो मॅथ्यूजला टाईम आउट बाद केल्यानंतर शकीब अल हसनवर भडकले लोक, सोशल मिडीयावर केल जातंय तुफान ट्रोल..

त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने अंपायरला टाईम आउटचे आवाहन केले आणि अँजेलो मॅथ्यूज मैदानावर उशिरा पोहोचल्याने त्याला बाद घोषित करण्यात आले. अँजेलो मॅथ्यूजला आयसीसीच्या नियमानुसार आऊट देण्यात आले होते पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी घटना प्रथमच पाहायला मिळाली आहे.

अँजेलो मॅथ्यूजला बाद दिल्यानंतर शाकीबवर भडकले चाहते, सोशल मिडीयावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया..

 

 

 


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *