BCCI Annual Contract: बीसीसीआई ने या 5 दिग्गज खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले, क्रिकेट करियर वर लागू शकतो कायमचा ब्रेक.

Cricket 1

 

 

2023-24 या नवीन वर्षात BCCI ने जाहीर केलेल्या वार्षिक कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनेक बदल दिसले आहेत. BCCI ने जाहीर केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनेक नवीन तसेच युवा खेळाडूंचा समावेश आहेत. परंतु या मुळे बऱ्याच अनुभवी खेळाडूंना या कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले आहे. याचबरोबर श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोन्ही अनुभवी खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट मधून काढून टाकले आहे. या बरोबरच चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर काढले आहे.

Cricket 1

 

कोण आहे ते 5 खेळाडू:-

 

चेतेश्वर पुजारा:-

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलनंतर चेतेश्वर पुजारा ला भारतीय क्रिकेट संघात अजिबात प्रवेश मिळाला नाही. चेतेश्वर पुजारा उत्तम फलंदाज असून सुद्धा BCCI ने कॉन्ट्रॅक्ट मधून पुजारा ला वगळले आहे. चेतेश्वर पुजारा ने रणजी ट्रॉफी तसेच घरेलु क्रिकेट मध्ये उत्तम कामगिरी केली होती तरीसुद्धा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा चेतेश्वर पुजारा चे नाव नाही.

 

अजिंक्य रहाणे:-

भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू तसेच अनेक टेस्ट मॅचेस मध्ये भारतीय क्रिकेट संघाला अनेक वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. अजिंक्य रहाणे हा WTC 2023 चा अंतिम सामना सुद्धा खेळला होता त्यानंतर तो उपकर्णधार म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला. परफॉर्मन्स चांगला असून सुद्धा BCCI ने त्याला संघाच्या बाहेर ठेवले.

 

 

उमेश यादव:-

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव ला ओळखले जात होते तसेच भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून संघर्ष करत आहे. पुजारा आणि रहाणेप्रमाणे तोही आधीच्या कराराचा भाग होता. परंतु यंदा च्या वर्षी नवीन करारातून उमेश यादव ला वगळले आहे.

 

शिखर धवन:-

भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज म्हणून शिखर धवन ला ओळखले जाते. शिखर धवन ने 2022 साली भारतीय संघातून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर शिखर 4धवन ला कॉन्ट्रॅक्ट मधून काढून टाकले.

 

इशांत शर्मा:- 

भारतीय संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्मा ला ओळखले जायचे परंतु गेल्या काही दिवसात आपल्याला कोणत्याच सामन्यात त्याचा सहभाग दिसला नाही. BCCI ने इशांत शर्मा ला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर काढले आहे.

 

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:- यह है असली किंग, जे सचिन, सेहवाग, गंभीर ला जमल न्हवत ते या वाघाने केलं, वाचा सविस्तर.

 

 

 

 

 

हे ही वाचा:- या 5 भारतीय खेळाडूंवर आहेत लाखो मुली फिदा, विवाहित असून सुद्धा मुलींची लग्न करण्याची तयारी.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *