श्रीलंकेच्या संघाला आणखीन एक धक्का; ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून पडला बाहेर

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये विजयासाठी संघर्ष करणाऱ्या श्रीलंकाच्या संघासाठी आणखीन एक वाईट बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज लहिरू कुमार हा विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. लहिरूला अफगाणिस्तान विरुद्ध सोमवारी होणाऱ्या सामन्याची तयारी करत असताना मांडीचा स्नायू दुखावला गेला. दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.

लहिरू सध्या तुफान फार्मात आहे. इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वापूर्ण सामन्यांमध्ये त्याने 3 विकेट घेत श्रीलंकेला एक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्याच्या जागी आता दुश्मता चमिरा याला संघात सामील करण्यात आले. चमीराला संघात सामील करून घेण्यासाठी आयसीसीच्या समितीने मान्यता देखील दिली आहे.चमीराला 100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका संघाला होऊ शकतो. 

श्रीलंकेच्या संघाला सध्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दुखापतीच्या ग्रहण लागले आहे. लहिरू दुखापती मधून बाहेर पडणारा श्रीलंकेचा तिसरा खेळाडू आहे. इंग्लंड विरुद्ध च्या सामन्यापूर्वी मथिशा पथिरना हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्या जागी अँजेलो मॅथ्यूजया अनुभवी खेळाडूला संघात स्थान देण्यात आले.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्या श्रीलंका संघाने केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर इतर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पाचव्या सामन्यात त्यांनी डिपेंडिंग चॅम्पियन इंग्लंडच्या संघाचा आठ गडी राखून पराभव केला होता. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला 156 धावांवर बाद केले होते. 157 धावांचे मिळालेले लक्ष पार करण्यासाठी श्रीलंकेने केवळ दोन गडी गमावले होते.

लहिरूचे संघातून बाहेर पडणे श्रीलंका संघासाठी मोठा धक्का असू शकतो. कारण बेंगलोर मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने 3 महत्त्वपूर्ण गडी बाद करून श्रीलंकेकडे सामना झुकवला होता. या सामन्यांमध्ये त्याने जोस बटलर, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टन यांना बाद केले होते. त्याच्या या बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच त्याने विश्वचषकातील चार सामन्यात पाच गडी बाद केले आहेत.

दसून शांनका, मथिंश पतिराणा स्पर्धा सुरू असताना दुखापतग्रस्त झाले आहेत. लहिरू विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणारा श्रीलंकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचे आणखीन चार सामने बाकी आहेत. सेमी फायनल मध्ये मजल मारण्यासाठी त्यांना हे चारही सामने जिंकावेच लागणार आहे.