2023 वर्ल्डकप सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का.. वर्ल्डकप संघातील दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर..
2023 चा विश्वचषक सुरु होण्यासाठी सध्या काहीच दिवस सुरु आहेत. त्याआधी प्रत्येक देशाचा संघ आपल्या सर्व खेळाडूमधून चांगले खेळाडू निवडण्याची तयारी करत आहे. मात्र विश्वचषक सुरू होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला एक वाईट बातमी मिळाली आहे आणि त्यांचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) आणि सिसांडा मगाला (Sisanda Magala) दुखापतीमुळे आगामी आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या दोघांच्या वर्ल्डकप न खेळण्याला दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी दुजोरा दिला. याशिवाय अष्टपैलू अँडिले फेहलुकवायो आणि वेगवान गोलंदाज लिझार्ड विल्यम्स यांचा बदली म्हणून समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज नॉर्टजेला (Anrich Nortje) पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली आणि त्याने फक्त पाच षटके टाकली होती. यानंतर त्याचे स्कॅन आणि चाचणीही करण्यात आली. मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळू शकला नाही. मगाला (Sisanda Magala) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळला होता आणि त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या कारणामुळे दोन्ही वेगवान गोलंदाज विश्वचषकातून बाहेर आहेत.
या दोन खेळाडूंच्या एक्झिट आणि त्यांच्या बदलीबाबत प्रतिक्रिया देताना रॉब वॉल्टर म्हणाले,
एनरिक आणि सिसांडा हे दोघेही ५० षटकांच्या विश्वचषकातील दर्जेदार खेळाडू आहेत जे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या बाहेर पडण्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे आणि त्यांनी पुनरागमनाच्या दिशेने त्यांचे कार्य सुरू ठेवतांना आवश्यक ते सर्व सहकार्य देणे सुरू ठेवू .
🟡 #CWC23 TEAM UPDATE 🟢
White-ball head coach Rob Walter today confirmed that Anrich Nortje & Sisanda Magala have been ruled out of the @cricketworldcup in India 🇿🇦🏆
✅ Andile Phehlukwayo & Lizaad Williams
❌Sisanda Magala & Anrich Nortje #BePartOfIt pic.twitter.com/WhDiCNDNjY
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 21, 2023
हे दोघे वर्ल्डकप मधून बाहेर गेल्यामुळे अँडिले आणि लिझार्ड यांना जागतिक स्तरावर संधी मिळू शकते. दोन्ही खेळाडू वर्ल्डकप जर्सी प्रदर्शन कार्यक्रमाचा भाग होते तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलीकडील पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत होते. यंदाच्या विश्वचषकासाठी आमच्या १५ जणांच्या संघात त्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
विश्वचषक २०२३ साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, लिझार्ड विल्यम्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, ताबरासेन ड्यूसेन, रबाडा .
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..