Virat Kohli Bowling Video: तब्बल 9 वर्षाननंतर विराट कोहलीला मिळाली विकेट, पत्नी अनुष्का शर्मा झाली भलतीच खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

Virat Kohli Bowling Video: तब्बल 9 वर्षाननंतर विराट कोहलीला मिळाली विकेट, पत्नी अनुष्का शर्मा झाली भलतीच खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

Virat Kohli Bowling Video: भारत आणि नेदरलँड्सयांच्यात झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात  बंगळुरूमधील चाहते विराट कोहलीला गोलंदाजीत आणावे, असे आवाहन करत होते. कर्णधार रोहित शर्मानेही क्रिकेटप्रेमींची निराशा न करता किंग कोहलीला गोलंदाजीसाठी पाचरण केले. येथे 35 वर्षीय खेळाडूने त्याच्या चाहत्यांनाही निराश केले नाही. विरोधी कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद करून त्याने वनडे फॉरमॅटमध्ये पाचवे यश मिळवले.

भारताचे 25 वे षटक टाकत असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli )चेंडूवर स्कॉट एडवर्ड्सला केएल राहुलने विकेटच्या मागे झेलबाद केले. राहुलने अप्रतिम झेल घेत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सामन्यादरम्यान, एडवर्ड्सने आपल्या संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण 30 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, एका चौकाराच्या मदतीने तो १७ धावा करण्यात यशस्वी झाला.

Virat Kohli Bowling Video: तब्बल 9 वर्षाननंतर विराट कोहलीला मिळाली विकेट, पत्नी अनुष्का शर्मा झाली भलतीच खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

विराटच्या ( Virat Kohli) गोलंदाजीवर  स्कॉट एडवर्ड्स बाद होताच अनुष्का झाली भलतीच खुश,  अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील भारत विरुद्ध नेदरलँड सामना पाहण्यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचली आहे. सामन्यादरम्यान ती कोहलीच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करतांना दिसत होती. स्कॉट एडवर्ड्स बाद होताच किंग कोहलीपेक्षा जास्त अनुष्का सेलिब्रेशन करतांना दिसत होती. आयसीसीने या क्षणाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Virat Kohli Bowling Video: तब्बल 9 वर्षाननंतर विराट कोहलीला मिळाली विकेट, पत्नी अनुष्का शर्मा झाली भलतीच खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

IND vs NED: विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ७१ वे अर्धशतक झळकावले.

गोलंदाजीपूर्वी विराट कोहलीने फलंदाजीतही वर्चस्व गाजवले. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण 56 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 91.07 च्या स्ट्राइक रेटने 51 धावा करण्यात यशस्वी झाला. कोहलीचे वनडे कारकिर्दीतील हे ७१ वे अर्धशतक आहे.

हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत