आजारी असूनही विराट कोहलीने पूर्ण केले शतक! अनुष्काच्या इंस्टाग्राम स्टोरीने वेधले सर्वांचे लक्ष

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा कसोटीतील शतकाचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला आहे. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत कोहलीने १८६ धावांची शानदार खेळी केली. कोहलीने १२०४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कसोटी क्रिकेटमधील २८ वे शतक पूर्ण केले आहे. शतक झळकावल्यानंतर त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशनही केले. किंग कोहलीने हे खास शतक पत्नी अनुष्का शर्माला समर्पित केले. दरम्यान अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे.
अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी विराट कोहलीने ३६४ चेंडूंचा सामना करत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांची शानदार खेळी केली. २३ नोव्हेंबर २०१९ नंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. हे शतक झळकावल्यानंतर त्याने खास सेलिब्रेशन केले आहे. त्याचवेळी पत्नी अनुष्का शर्माने कोहलीच्या या शानदार खेळीचे कौतुक केले आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, “आजारी असूनही त्याच भावनेने खेळणे मला नेहमीच प्रेरणा देते.” अनुष्काची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/ViratGang/status/1634879371411595268?t=3y1APi5Wu–e1XHwOs_YUg&s=19
किंग कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे २८ वे शतक आहे. तर ५५२ व्या इनिंगमध्ये त्याने ७५ वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद ७५ शतक पूर्ण करण्याचा विक्रम मोडून काढला आहे.