4.4.2.6.4. 4 ईशान किशनच्या संघातील खेळाडूने केली अर्जुन तेंडूलकरची जोरदार धुलाई, मारल्या एवढ्या बौड्रीज की विकेट घेण्यासाठी तरसला सचिनचा मुलगा, सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय व्हायरल.
जेव्हापासून अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात गोवा संघासाठी दमदार शतक झळकावले तेव्हापासून तो सर्वत्र चर्चेत आहे. आज म्हणजेच २० डिसेंबर रोजी झारखंड आणि गोव्यात सामना खेळवला जात आहेत. या सामन्यात झारखंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तर दुसरीकडे गोवा संघाकडून गोलंदाज अर्जुन तेंडुलकरकडून सर्वानाच अपेक्षा होती की,या सामन्यायातसुद्धा अर्जुन आपल्या गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकेल. मात्र प्रत्येक्षात तसे झाले नाही.

रणजी ट्रॉफी 2022-23 च्या हंगामात आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी गोवा आणि झारखंड यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात झारखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे गोवा संघातून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर घातक गोलंदाजी करताना नक्कीच अनेक विकेट्स घेताना दिसेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
संपूर्ण दिवसभरात गोलंदाजी करतांना अर्जुन विकेटसाठी आसुसलेला दिसला. त्याने 15 षटके टाकली, परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. या दरम्यान अर्जुनचा इकॉनॉमी रेट 3.60 होता.
रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामातील पहिल्या सामन्यात गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने राजस्थान संघाविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी सादर केली. प्रथम, जेव्हा त्याने 8 षटके टाकली तेव्हा त्याला एकही विकेट मिळाली नाही ज्यात त्याने एकही ओव्हर मेडन टाकला. त्यानंतर घातक गोलंदाजी करताना अर्जुनने धावांचा पाऊस पाडणाऱ्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
त्याने सामन्यात तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, ज्यात राजस्थानचा आक्रमक फलंदाज महिपाल लोमरोड (63) आणि सलमान खान (40) यांची पहिली विकेट घेतली. त्यानंतर शेवटच्या दिवशी त्याने 11व्या क्रमांकाचा फलंदाज अनिकेत चौधरी (38) याचीही विकेट घेतली, ज्याने 10व्या क्रमांकावर आलेल्या अराफत खानसोबत 98 धावांची भागीदारी केली.
Glimpses from #ArjunTendulkar maiden Ranji Century against Maharashtra!
Technique looks set .. needs to improve is running 😂 pic.twitter.com/p7aeL5MTXS
— 🏏🐼 (@Cric_GRH) December 20, 2022
सचिनचा मुलगा असल्यामुळे रणजी ट्रॉफीच्या सुरवातीपासूनच चर्चेत आहे अर्जुन..
अर्जुन तेंडूलकरहा भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचा मुलगा आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटचे धडे दिले गेले असल्यामुळे तो लवकरच भारतीय संघात आगमन करेल, असा विश्वास सचिनच्या चाहत्यांना आहे. तर दुसरीकडे मात्र अर्जुनने स्वतःच्या कामगिरीवर टीम इंडियात इंट्री करेल, असे मत सचिन तेंडूलकरने व्यक्त केले आहे.