हार्दिक पंड्यानंतर काही दिवसातच अर्जुन तेंडूलकर होईल भारतीय संघाचा कर्णधार, स्वतः दिग्गज खेळाडूने सांगितले 3 कारणे.
भारतीय संघात सध्या युवा खेळाडूंना चांगली संधी दिली जात आहे. दिग्गज भारतीय खेळाडूंना ट्वेंटी-ट्वेंटी फोर्मेट मधून लांब ठेवून शक्य तेवढे युवा खेळाडू ट्वेंटी संघात दाखल करण्याची योजना सध्या बीसीसीआय ने आखली आहे आणि हार्दिक पंड्याला कर्णधार बनवून त्या योजनेवर कामही करण्यास सुरवात केली आहे.
हार्दिक पंड्या कर्णधार झाल्यानंतर आता अनेक युवा खेळाडू भारतीय संघात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रामुख्याने नाव घेतले जातंय ते म्हणजे सचिन तेंडूलकरचा मुलगा ‘अर्जुन तेंडूलकर’ अर्जुन हा येत्या काळात टीम इंडियात दाखल होणार्या खेळाडूपैकी एक असल्याचे बोलले जातंय.
त्यामागे काही प्रमुख कारणे सुद्धा संगीतली जाताहेत ती अशी..
View this post on Instagram
१.अर्जुन देशांतर्गत करत असलेली कामगिरी:
अर्जुन तेंडूलकरने देशांतर्गत स्पर्धेत म्हणजेच आधी दिलीप ट्रॉफी आणि नंतर आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करून निवड समितीतील सदस्यांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. गोव्याकडून खेळतांना अर्जुनने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. म्हणूनच अर्जुनचे मागचे प्रदर्शन आणि देशांतर्गत स्पर्धेतील जबरदस्त कामगिरी पाहता अर्जुन लवकरच संघात सामील होऊ शकतो.
२.दुसरे कारण म्हणजे सचिनचा मुलगा म्हणून मिळणारा फायदा.
अर्जुन हा क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा मुलगा आहे. मागच्या अनेक दिवसापासून अर्जुन भारतीय संघात पदार्पण करेल असं बोललं जातंय त्यामागचे कारण स्वतः सचिनसुद्धा आहे. सचिन स्वतः आपल्या मुलाला भारतीय संघात खेळवण्याचे प्रयत्न करत असल्याचे बोलले जातंय. त्याअनु संगाने सचिनच्या ओळखी पाहता अर्जुनला त्याचा फायदा नक्की होऊ शकतो.

३.अर्जुनला आयपीएल मध्ये मिळाले अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन
आयपीएल मध्ये अर्जुन तेंडूलकर कालपर्यंत मुंबई ईंडीयन्सचा भाग होता. या मिनी लिलावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने अर्जुनसह आणखी काही खेळाडूंना रिलीज करण्यात आले. मात्र याआधी तीन वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळतांना अर्जुनला दिग्गज प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्या मार्गदर्शनाचा फायदा अर्जुनला भारतीय संघात प्रवेश करण्यास नक्कीच मदत करेल.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…