अर्जुन तेंडुलकरचा दुष्काळ संपणार! सूर्यकुमार यादव च्या जागी अर्जुन तेंडुलकर ला लवकरच संधी मिळणार?
क्रिकेट आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट मध्ये करियर करण्याचे असेल तर त्यासाठी सर्वात आवश्यक मेहनत आणि कष्ट घेणे खूप गरजेचे आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ला सुद्धा संघात घेण्यासाठी विचार केला जातो. कारण जर का खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला असेल तरच त्याला संघामध्ये खेळवता येते.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्स संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा चार वेळा शून्य धावांवर बाद झाल्यामुळे सूर्यकुमार यादव च्या जागी अर्जुन तेंडुलकर ला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलया चा१६ व्या सिझन मधील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स या संघाने जोरदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स संघावर ६ गडी राखून विजय मिळवला.
परंतु भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. मिस्टर ३६० सोबत तुलना होत असलेल्या सूर्यकुमार यादवला बॅटला बॉल लावण्यात देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव च्या फॅन्स ने सूर्यकुमार यादव ला संघाच्या बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
तसेच बऱ्याच वेळा सूर्यकुमार यादवला संधी देऊन सुद्धा सूर्यकुमार यादव ला चांगला परफॉर्मन्स देता आला नाही. त्यामुळे त्याच्या जागी सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर ला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळू शकते.
मात्र अर्जुन तेंडुलकर हा सूर्यकुमार यादवच्या जागी खेळू शकत नाही. कारण तो अष्टपैलू खेळाडू आहे. तो एक गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवू शकतो.