- Advertisement -

ARJUN TENDULKAR IPL DEBUT: अखेर 2 वर्षाची प्रतीक्षा संपली, सचिनच्या मुलाचे झाले आयपीएलमध्ये पदार्पण पहिल्याच गेममध्ये गोलंदाजी करतांना दिल्या इतक्या धावा..

0 4

ARJUN TENDULKAR IPL DEBUT: अखेर 2 वर्षाची प्रतीक्षा संपली, सचिनच्या मुलाचे झाले आयपीएलमध्ये पदार्पण पहिल्याच गेममध्ये गोलंदाजी करतांना दिल्या इतक्या धावा..


IPL 2023 Arjun Tendulkar Debut : आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मुंबई इंडियन्सच्या संघासमोर आहे. या सामन्यात तेच घडणार आहे, ज्याची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत होते. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माच्या पोटात दुखत आहे. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये ड्वेन जॉन्सनचा समावेश करण्यात आला आहे. इम्पॅक्ट प्लेअरमध्ये अर्जुन तेंडुलकरचेही नाव आहे, तो या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार आहे.

अर्जुनचा यंदाच्या लिलावात मुंबई संघाने 30 लाख रुपयांना आपल्या संघात समावेश केला होता. मात्र प्रत्येक वेळेप्रमाणे हा खेळाडू पुन्हा एकदा पहिल्या संधीची वाट पाहत होता. IPL 2018 च्या मेगा लिलावात मुंबई संघाने प्रथम अर्जुनचा आपल्या संघात समावेश केला होता, परंतु आजपर्यंत या खेळाडूला एकही IPL सामना खेळता आलेला नाही.

अखेर अर्जुन तेंडूलकर उतरला आयपीएल सामन्यात.. (ARJUN TENDULKAR IPL DEBUT)

अर्जुन तेंडुलकर तीन वर्षे मुंबई इंडियन्सच्या शिबिरात सहभागी होत होता. त्याला सतत बेंचवर बसावे लागत होते. गेल्या मोसमातही तो पदार्पण करेल अशी अटकळ होती पण त्याला संधी मिळाली नाही. आता मोसमातील चौथ्या सामन्यात अर्जुनला मुंबईची कॅप मिळाली आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळत नसून सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच जोफ्रा आर्चर कोपरच्या दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये.

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 7 लिस्ट ए सामने आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 4.98 च्या इकॉनॉमीमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अर्जुनने टी-20 मध्ये 12 विकेट घेतल्या.

ARJUN TENDULKAR IPL DEBUT

आता रणजी फॉरमॅटमध्ये बॅटने चमत्कार करून त्याने दाखवून दिले आहे की तो येणाऱ्या काळात एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो. प्रथम श्रेणीमध्ये अर्जुनने 3.42 च्या इकॉनॉमीमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत आणि एका शतकासह 223 धावा केल्या आहेत. 120 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.


हेही वाचा:

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीमध्ये आतापर्यंत झालेत हे 10 विक्रम, पुजारा आणि शुभमनने नावावर केले अनोखे विक्रम..

आधी फलंदाजी करून बनवले रन्स आता गोलंदाजीने मोडले बांग्लादेशचे कंबरडे, 5 विकेट घेताच कुलदीप यादवने जिंकले लोकांचे मन तर सिलेक्शन कमिटीला केलं जातंय ट्रोल..

Leave A Reply

Your email address will not be published.