पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..
पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ‘इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी मार्को जॉन्सन, फिन ऍलन आणि इब्राहिम झद्रान यांच्यासह नामांकन मिळाले. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पुरस्कारांसाठी जानेवारीत मतदान सुरू होईल.
अर्शदीपला आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. अश्या पद्धतीने पहिल्यांदाच एखाद्या युवा गोलंदाजाला अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याच्या 6 महिन्याच्या आतच पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18.12 च्या सरासरीने 33 बळी घेतले आहेत. अर्शदीप सिंग नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर अर्शदीप सिंगने भारतासाठीही चांगली कामगिरी केली. अर्शदीप सिंगने नुकत्याच भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

अर्शदीप सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीत काही संस्मरणीय कामगिरी केली आहे. यामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध उच्च-दबाव T20 विश्वचषक सामन्यातील प्रभावी कामगिरीचाही समावेश आहे. त्या सामन्यात अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोन्ही सलामीवीरांना वेग आणि स्विंगमुळे पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
एवढेच नाही तर अर्शदीप सिंगने डेथ ओव्हर्समध्येही अप्रतिम गोलंदाजी करत आसिफ अलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीपने पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात ३२ धावांत तीन बळी घेतले होते.
We Rise Together🇮🇳✨ pic.twitter.com/YQLiczPTPw
— Arshdeep Singh (@arshdeepsinghh) November 22, 2022
अर्शदीपला दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॉन्सन, न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन आणि अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झद्रान यांच्याकडून 2022 च्या ICC इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी आव्हान दिले जाईल. मार्को जॉन्सनने कसोटीत 19.02 च्या सरासरीने 36 विकेट्स आणि 22.90 च्या सरासरीने 229 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात 2 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक विकेट घेतली आहे.
या पुरस्काराचा विजेता ठरवण्यासाठी जानेवारीपासून मतदान होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. चाहते अर्शदीपला यात जास्त मते मिळाली तर तो ‘इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर’ ठरणारा सर्वांत युवा गोलंदाज असेल..