- Advertisement -

“पाजी छा गये” अर्शदीप सिंहने तिलक वर्माला बोल्ड करत मोडला मधला स्टंप तर सूर्याच्या फटकेबाजीचे चाहते झाले दिवाने, पहा व्हिडीओ..

0 1

“पाजी छा गये” अर्शदीप सिंहने तिलक वर्माला बोल्ड करत मोडला मधला स्टंप तर सूर्याच्या फटकेबाजीचे चाहते झाले दिवाने, पहा व्हिडीओ..


22 एप्रिल रोजी वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MIvsPBKS) यांच्यात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) यांनी जबरदस्त प्रदर्शन दाखवत मेहफिल लुटली.

या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. सूर्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी, त्याच्या फलंदाजीने प्रेक्षक चांगलेच प्रभावित झाले. त्याचवेळी सामना संपल्यानंतर चाहते सोशल मीडियावर यादव आणि अर्शदीपवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसले.

अर्शदीप सिंह

अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) शेवटच्या षटकात  सामन्याचे चित्र पालटले..

इंडियन प्रीमियर लीग  (IPL2023) चा 31 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)यांनी चांगली कामगिरी केली. सूर्याने २६ चेंडूत ५७ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर अर्शने २० व्या षटकात पंजाबच्या (PBKS) विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याने एमआयच्या डावातील शेवटच्या षटकात दोन धावा देत दोन मागच्या षटकात दोन बळी घेतले. त्याने तिलक  वर्मा (Tilak Varma)आणि नेहल वढेरा (Nehal Wadhera) यांनाक्लीन बोल्ड केले. तर, पीबीकेएसने 13 धावांनी विजय मिळवला. या दोघांच्या या कामगिरीने चाहते खूप खूश झाले आणि सोशल मीडियावर अर्शदीप आणि सूर्याची स्तुरी करतांना दिसले.

सोशल मिडीयावर सूर्या आणि अर्शदीपची हवा..

https://twitter.com/kevlartweetz/status/1649835639846871042?s=20

https://twitter.com/Sportscasmm/status/1649835463132483586?s=20

हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.