IND vs NZ 1st T20: अर्शदीप सिंग ‘नो बॉल’ फेकण्यापासून थांबेना.. पहिल्याच सामन्यत हे 2 लाजिरवाणे विक्रम केले नावावर..
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि नो बॉलचे नाते संपण्याचे नाव घेत नाही आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या तीन षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. अर्शदीपने पहिल्या तीन षटकांमध्ये एकही नो बॉल न टाकता केवळ २४ धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने शेवटच्या षटकांत २७ धावांची उधळण करत लाजिरवाण्या विक्रमांची नोद केली.
पहिल्या तीन षटकांत उत्तम गोलंदाजी केल्याने, कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर डावातील सर्वात कठीण २० वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. अर्शदीप येथे कर्णधाराच्या भरवशावर खरा उतरला नाही. त्याने नो बॉलने षटकाची सुरुवात केली. शेवटच्या षटकात त्याने एकूण २७ धावा देत अनेक लाजिरवाणे विक्रम आपल्या नावावर केले.

अर्शदीप सिंगने पहिल्या तीन चेंडूत २३ धावा दिल्या –
अर्शदीप सिंगच्या शेवटच्या षटकाबद्दल बोलायचे तर, त्याने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. ज्यावर डॅरेल मिशेलने लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारला. यानंतर अर्शदीप सिंगने पुढील तीन चेंडूंत दोन षटकार आणि एक चौकारासह आणखी १६ धावा दिल्या. अर्शदीपने पहिल्या तीन चेंडूंमध्ये २३ धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या तीन चेंडूंमध्ये त्याने केवळ चार धावा दिल्या, मात्र तोपर्यंत टीम इंडियाचे नुकसान झाले होते. अर्शदीपच्या या २७ धावांमुळे न्यूझीलंडचा संघ १७६ धावांपर्यंत मजल मारू शकला आणि भारताला या सामन्यात २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
यासह अर्शदीप सिंग २० व्या षटकात भारताकडून सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ धावा देणाऱ्या माजी फिरकी गोलंदाज सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. एवढेच नाही तर एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
That's that from Ranchi.
New Zealand win the first T20I by 21 runs in Ranchi.#TeamIndia will look to bounce back in the second #INDvNZ T20I.@mastercardindia pic.twitter.com/Lg8zmzwYVH
— BCCI (@BCCI) January 27, 2023
डावाच्या २०व्या षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय –
२७- अर्शदीप सिंग २०२३
२६- सुरेश रैना २०१२
२४- दीपक चहर २०२२
२३- खलील अहमद २०१८
२३- हर्षल पटेल २०२२
एका षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज –
३४ – शिवम दुबे विरुद्ध न्यूझीलंड, २०२०
३२ – स्टुअर्ट बिन्नी विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६
२७ – शार्दुल ठाकुर विरुद्ध श्रीलंका, २०१८
२७ – अर्शदीप सिंग विरुद्ध न्यूझीलंड, २०२३
२६ – सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१२
२६ – अर्शदीप सिंग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२२
२५- युवराज सिंग विरुद्ध न्यूझीलंड, २००७
हेही वाचा:
ईशान किशन पाठोपाठ विराट कोहलीनेही ठोकले ताबडतोब शतक, 44 व्या शतकासाठी विराट कोहलीने मोडले हे मोठे विक्रम..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :