- Advertisement -

मोठी बातमी..! सचिनचा लेक ‘अर्जुन तेंडूलकर’ मुंबईकडून बूमराहच्या जागी खेळणार, स्वतः कर्णधार रोहित शर्माने दिले स्पष्ट संकेत..

0 0

मोठी बातमी.. सचिनचा लेक ‘अर्जुन तेंडूलकर’ मुंबईकडून बूमराहच्या जागी खेळणार, स्वतः कर्णधार रोहित शर्माने दिले स्पष्ट संकेत..


आता आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ३१ मार्चपासून सुरू होत आहे. या मेगा टूर्नामेंटसाठी सर्व संघांनी जोरदार तयारी केली आहे. या मेगा टूर्नामेंटची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे.

जगातील महान फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा ‘अर्जुन तेंडुलकर; यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. खुद्द मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार बैठकीत याला दुजोरा दिला आहे. जाणून घेऊया कॅप्टन रोहित काय म्हणाला.

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार?

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. याआधीही मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. दरम्यान, माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुलाला मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळणार असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. तो 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीविरुद्ध पदार्पण करताना दिसू शकतो.

अर्जुन गेल्या काही काळापासून मुंबई इंडियन्सच्या सेटअपचा एक भाग आहे. गेल्या वर्षीच्या लिलावात मुंबईने अर्जुन तेंडुलकरला ४० लाख रुपयांना खरेदी केले होते. तरीही त्याला आतापर्यंत संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. गेल्या वर्षी कर्णधार रोहितने मुंबई संघात हृतिक शोकीन, रमणदीप सिंग आणि संजय यादव या खेळाडूंना संधी दिली होती. मात्र अर्जुन तेंडुलकरने गेल्या वर्षी एकही सामना खेळला नाही.

प्री-सीझनच्या पत्रकार परिषदेत, मुंबईचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेल्या मार्क बाउचरला अर्जुनच्या आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पदार्पणाबद्दल विचारण्यात आले, तो म्हणाला, “अर्जुन फक्त किरकोळ दुखापतीतून सावरत आहे. म्हणून तो आज रात्री खेळणार आहे आणि आशा आहे की तो जे करू शकतो ते आम्ही त्याला पाहू शकतो. मला वाटते की तो गेल्या ६ महिन्यांत खूप क्रिकेट खेळत आहे. एक गोलंदाज म्हणून तो त्याच्यासाठी खूप चांगला आहे, म्हणून होय, जर आम्ही त्याला निवडीसाठी उपलब्ध करू शकलो तर ते आमच्यासाठी खूप चांगले होईल.

अर्जुन तेंडूलकर

अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाबद्दल रोहित शर्माशी बोलताना तो म्हणाला, “चांगला प्रश्न आहे. आशा आहे, कदाचित तो तुम्हाला मैदानावर दिसेल.”

अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करू शकतो. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी सीझनपूर्व पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले आहेत. मुंबई संघ यंदा दुखापतींच्या समस्येशी झुंज देत आहे. अर्जुन संघाला चांगले संतुलन देऊ शकतो. तो डावखुरा वेगवान गोलंदाजी करण्यासही सक्षम आहे आणि बॅटनेही चांगले योगदान देऊ शकतो. अर्जुन यंदा मुंबई इंडियन्ससाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.


हेही वाचा:

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

Leave A Reply

Your email address will not be published.