ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
IND vs ENG: भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन इंग्लंड विरुद्ध च्या मालिकेमध्ये जबरदस्त कामगिरी करत नवा इतिहास घडवला. या मालिकेमध्ये आर. अश्विन ने अनेक विक्रम पाठीमागे टाकले. इंग्लंड विरुद्धची मालिका त्याच्यासाठी ड्रीम सिरीज राहिली. इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने तब्बल 26 विकेट घेत लीडिंग विकेट टेकर राहिला.
धर्मशाळा येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावा चार तर दुसऱ्या डावात पाच विकेट घेत सामन्यात एकूण नऊ गडी बाद केले. पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात आणि 100 व्या कसोटी सामन्यांमध्ये पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. या सह तो एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा भारताचा टॉप वनचा गोलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विन ने एकाच डावात 36 वेळा पाच विकेट घेतले आहेत.
भारतातर्फे एकाच डावात पाच बळी सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर होता. आर. अश्विनच्या या नव्या पराक्रमामुळे अनिल कुंबळे आता दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यांमध्ये 35 वेळा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. तर टर्बनेटर हरभजन सिंग याने 103 कसोटीत 25 वेळा पाच गडी बाद करण्याचा कारनामा केला होता.
अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग हे दोघेही आता क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. 37 वर्षीय आर. अश्विन कडे आणखीन बरेच क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे तो आणखीन या विक्रमात भर घालू शकतो. त्याचा फॉर्म आणि फिटनेस जबरदस्त आहे. विशेष म्हणजे तो केवळ कसोटी क्रिकेट खेळतोय.
या कसोटी मालिकेत त्याने 500 बळीचा टप्पा देखील पूर्ण केला. यासह तो मायदेशात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील झाला आहे. अश्विनने अनिल कुंबळे याला पाठीमागे टाकत नवा विक्रम केला. मायदेशात सर्वाधिक विकेट घेण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम त्याने काल मोडीत काढला.
यासह आर. अश्विनने इंग्लंडविरुद्ध बळींचे शतक देखील पूर्ण केले. त्याने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध 113 बळी टिपले आहेत. 2011 मध्ये अश्विनने वेस्ट इंडीज विरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 9 गडी बाद केले होते.
अश्विनच्या पुढे आता श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथया मुरलीधरण हा आहे मुरलीधरणे 133 कसोटी सामन्यात 67 वेळा पाच गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न आहे, जो की 145 कसोटीत 37 वेळा पाच विकेट घेतला आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली आहेत. त्यांनी 86 कसोटी सामन्यात 36 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
मालिकेविषयी बोलायचे झाले तर, 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर भारताने सलग चार कसोटी सामने जिंकत मालिकेवर कब्जा मिळवला. 112 वर्षाच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिला कसोटी सामना हरल्यानंतर मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावे करण्याचा विक्रम भारतीय संघाने केला आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!
- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.
- जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर