IND vs BAN: अश्विनने बांग्लादेशच्या सर्वांत यशस्वी गोलंदाजाला चक्क एका हातानेच ठोकला जबरदस्त षटकार,पाहून कोहली आणि राहुलही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
IND vs BAN: अश्विनने बांग्लादेशच्या सर्वांत यशस्वी गोलंदाजाला चक्क एका हातानेच ठोकला जबरदस्त षटकार,पाहून कोहली आणि राहुलही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
बांगलादेश आणि भारत यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने यजमानांचा ३ विकेट्सने पराभव करत सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकाही २-० ने जिंकली. बांगलादेशमध्ये जाऊन भारतीय संघाने त्यांना कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिल्यामुळे WTC गुणतालिकेत भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला आहे.
बांगलादेशने भारतासमोर दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे टीम इंडिया सहजासहजी साध्य करू शकली नाही. एकेकाळी सामना भारताच्या हाताबाहेर गेल्याचे दिसत होते. पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने ते यशस्वी केले. त्याचवेळी अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या या डावात एका हाताने षटकारही मारला, जो सध्या चर्चेत आहे.
वास्तविक, भारतीय फलंदाजांना डावातील 47 वे षटक टाकण्यासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज मेहदी हसन आला. ज्याच्या पहिल्याच चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या रविचंद्रन अश्विनने एका हाताने षटकार ठोकला. यानंतर संपूर्ण मैदानात जल्लोष उडाला. भारतीय खेम्यातील खेळाडूंनी जोरजोरात सेलीब्रेशन करायला सुरवात केली तर बांग्लादेशी खेळाडूंचे रीएक्शन पाहण्यासारखे होते.
मेहदीने तो चेंडू थोडा शोर्ट टाकला होता विशेष म्हणजे अश्विन शॉट बॉलसाठी आधीच तयार होता. त्यामुळे त्याने मिड-विकेटवर उचलून एका हाताने षटकार मारला. अशा परिस्थितीत आता रवीच्या या षटकाराचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अश्विनने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ:
https://youtu.be/BLObdQWalOE
सर्वप्रथम अश्विनने या सामन्यात 6 विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले. आणि त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 74 रन्समध्ये 7 विकेट गमावल्या असताना त्याने येऊन नाबाद 42 रन्सची जबरदस्त इनिंग खेळली आणि भारताला हरवलेला सामना जिंकून दिला.
या खेळीत अश्विनच्या बॅटमध्ये 4 चौकार आणि 1 षटकारही दिसला. अश्विनची गणना आता गोलंदाज म्हणून नव्हे तर अष्टपैलू म्हणून केली जात आहे. मात्र दुस-या कसोटी सामन्यात त्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.