Asia Cup 2023 Final:आज श्रीलंकेला हरवून आशिया कप जिंकण्याच्या इराद्याने उतरणार टीम इंडिया, या 11 खेळाडूंची लागू शकते संघात वर्णी..

By | September 17, 2023

Asia Cup 2023 Final:आज श्रीलंकेला हरवून आशिया कप जिंकण्याच्या इराद्याने उतरणार टीम इंडिया, या 11 खेळाडूंची लागू शकते संघात वर्णी..


Asia Cup 2023 Final:आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात रोमांचक सामना होणार आहे. हा सामना आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे आणि अंतिम फेरी जिंकण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतील. भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात.

Asia Cup 2023 Final या खेळाडूंचा भारताच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होऊ शकतो.

भारतीय संघ सुपर 4 फेरीत आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. अशा स्थितीत संघाने 5 दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली होती. ज्यामध्ये कोहली, हार्दिक, बुमराह, सिराज आणि कुलदीप यांचा समावेश होता. हे सर्व खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये प्रवेश करतील. त्याबदल्यात  तीलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी यांचे संघातील स्थान जाऊ शकते.

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना सपोर्ट करते, त्यामुळे भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अशा स्थितीत अक्षर पटेलच्या जागी कुलदीप, जडेजा, वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी दिली जाऊ शकते. सुंदर हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने जानेवारीत शेवटचा सामना खेळला होता.

Asia Cup 2023 Final India Vs SRILANKA

Asia Cup 2023 Final India Vs SRILANKA

 

Asia Cup 2023 Final श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग 11

 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

श्रीलंकेचा संघ:

पाथुम निसांका, सी असलंका, ड्युनिथ वेलेझ, डी डी सिल्वा, डी शनाका (क), के मेंडिस (विकेटकीप), एस समराविक्रामा, के परेरा, मथिशा पाथिराना, पी मदुशन, एस अरचिगे.


हेही वाचा:

टीम इंडियाचे ‘हे’ 3 क्रिकेटर नेहमीच व्हेज जेवणापेक्षा नॉनव्हेज जास्त खातात , एकाने तर स्वतः मीडियासमोर केलंय मान्य …

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *