आशिया चषक 2023 जिंकून टीम इंडिया मालामाल, मिळाले तब्बल एवढे कोटी रुपये, तर रनरअप श्रीलंका संघावरही पैश्याची उधळन.

By | September 18, 2023

आशिया चषक 2023 जिंकून टीम इंडिया मालामाल, मिळाले तब्बल एवढे कोटी रुपये, तर रनरअप श्रीलंका संघावरही पैश्याची उधळन.


आशिया चषक 2023 : भारतीय संघाने रविवारी कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून मोठा विजय तर नोंदवत आशिया चषक स्पर्धेतील आठवे विजेतेपदही पटकावले.

टीम इंडियाचे खेळाडू शानदार विजयाचा आनंद साजरा करताना दिसले. सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटो काढून आनंद साजरा केला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. तर श्रीलंकेचा संघही श्रीमंत झाला आहे.

मोहम्मद सिराज

आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर कुणाला किती पैसे मिळाले ? (Asia Cup 2023 Prize Money)

आशिया कपमध्ये चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाला 1.50 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर उपविजेता म्हणून श्रीलंकेच्या संघाला ७५ हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे ६२.३१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून ५ हजार डॉलर (जवळपास ४.१५ लाख रुपये) देण्यात आले.

कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून १५ हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. भारतीय चलनात ही रक्कम १२.४६ लाख रुपये आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेने टी-२० फॉरमॅटमध्ये आशिया कप जिंकला होता. त्यावेळी त्यांना ट्रॉफीसह बक्षीस म्हणून 1.59 कोटी रुपये मिळाले होते. तर पाकिस्तानला उपविजेते म्हणून 79 लाख रुपये देण्यात आले.

आशिया कप अंतिम सामना संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. जय शाह यांनी ट्विट केले आणि म्हटले- क्रिकेटच्या  मैदानावर काम करणाऱ्या सर्व नायकांना माझा प्रणाम.

आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांना कोलंबो आणि कॅंडीमधील समर्पित क्युरेटर्स आणि मैदानी खेळाडूंसाठी US$50,000 ची बक्षीस रक्कम जाहीर करताना अभिमान वाटतो. त्यांची अटल वचनबद्धता आणि कठोर परिश्रम आशिया चषक 2023 अविस्मरणीय बनले. खेळपट्टीच्या उत्कृष्टतेपासून ते रमणीय आउटफिल्डपर्यंत, त्यांनी हे सुनिश्चित केले की, रोमांचक क्रिकेट कृतीसाठी स्टेज तयार केला गेला आहे. चला त्यांच्या महान सेवांचा उत्सव साजरा करूया आणि त्यांचा सन्मान करूया!

मोहम्मद सिराज ठरला अंतिम सामन्याचा हिरो.

श्रीलंका आणि भारत यांच्यातील हा अंतिम सामना ‘काटे की टक्कर’ होईल असच वाटत होते. मात्र प्रथम गोलंदाजी करण्यास आलेल्या भारतीय संघाच्या गोलंदाजांनी सर्व सामनाचा एकतर्फी फिरवला. सुरवातीला जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजास बाद करण्यात सुरवात केली. आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने आपल्या घातक गोलंदाजीने श्रीलंकेचे 4 फलंदाज एकाच षटकात बाद करत सामना एकतर्फी फिरवला.

आशिया चषक

टीम इंडियाकडून आज सर्व 10 पैकी 10 विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतले. मोहम्मद सिराजने 21 धावा देऊन 6 गडी बाद केले तर. हार्दिक पंड्याने 3 आणि जसप्रीत बूमराहने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळतांना टीम इंडियाने 51 धावाचे माफक लक्ष केवळ 6 षटकांत पार केले आणि आशिया चषक 2023 वर आपले नाव कोरले..

आशिया कप संपल्यानंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा वर्ल्डकप 2023 कडे लागल्या आहेत.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *