Asian Games Final, Ind vs Afg: अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी भिडणार भारत-अफगाणिस्तान, ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना देऊ शकतात संघात जागा..
Asian Games Final, Ind vs Afg : आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) मध्ये पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शनिवारी, 7 ऑक्टोबर रोजी चीनमधील हांगझो येथे भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. क्रिकेट 2010 मध्ये आशियाई खेळांचा एक भाग बनले. तथापि, आशियाई खेळ 2023 मध्ये पुरुष आणि महिला गटात भारताने प्रथमच स्पर्धेत प्रवेश केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने यापूर्वीच सुवर्णपदक जिंकले आहे, त्यामुळे पुरुष संघालाही ही कामगिरी करावी लागणार आहे.
२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले होते. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. दरम्यान, अफगाणिस्तानने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव करत पुढच्या टप्प्यासाठी पात्रता मिळवली.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg ) यांच्यात टी20 प्रकारात आतापर्यंत फक्त चार वेळा सामना झाला आहे. याशिवाय अफगाणिस्तानने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. संघांची पहिली भेट मे २०१० मध्ये ग्रोस आयलेट येथे झाली. भारताने हा सामना 31 चेंडू शिल्लक असताना सात विकेटने जिंकला होता. अफगाणिस्तान आतापर्यंत भारताविरुद्ध एकही सामना जिंकू शकले नाहीये.
दुसऱ्या सामन्यात, ते सप्टेंबर 2019 मध्ये कोलंबो, श्रीलंकेत एकमेकांसमोर आले. पुन्हा एकदा, भारताने अफगाणिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये अबू धाबी येथे झालेल्या तिसऱ्या T20I सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. त्यांचा शेवटचा सामना सप्टेंबर 2022 मध्ये दुबई येथे झाला होता, जिथे अफगाणिस्तानचा भारताकडून 101 धावांनी पराभव झाला होता.
असे असू शकतात दोन्ही संघ
भारत:रुतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग.
अफगाणिस्तान: सेदीकुल्लाह अटल, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, गुलबदिन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, अफसर झझाई, करीम जनात, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान.