AUS vs AFG: मॅक्सवेल-कमिन्सने रचला इतिहास, एकदिवशीय क्रिकेटमध्ये असी कामगिरी करणारे ठरली पहिली जोडी..

AUS vs AFG: मॅक्सवेल-कमिन्सने रचला इतिहास, एकदिवशीय क्रिकेटमध्ये असी कामगिरी करणारे ठरली पहिली जोडी..

AUS vs AFG:  ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने आपल्या बॅटने आश्चर्यकारक कामगिरी केली. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्ससह आठव्या विकेटसाठी एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी करत अफगाणिस्तानकडून विजय हिसकावून घेतला आणि आपल्या संघ ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत नेले.

AUS vs AFG: मॅक्सवेल-कमिन्सने केली आठव्या विकेटसाठी 200+ धावांची भागीदारी..

 AFG vs AUS: वानखेडे स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलने पाडला धावांचा पाऊस, दुहेरी शतक झळकावत तोडले 5 मोठे विक्रम..

कमिन्ससह मॅक्सवेलने आठव्या विकेटसाठी 202 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीत पॅट कमिन्सने केवळ 12 नाबाद धावा केल्या आणि ग्लेन मॅक्सवेलनेबाकी धावा काढल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विश्वविक्रम केला.
या दोघांची ही भागीदारी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील आठव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे.

या जोड्यांनी केली होती आतापर्यंत ची सर्वांत मोठी भागीदारी.

यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू हॉल आणि जस्टिन कॅम्प यांनी 2006 मध्ये भारताविरुद्ध आठव्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद भागीदारी केली होती, जी आठव्या विकेटसाठी आतापर्यंतची सर्वोच्च वनडे भागीदारी होती.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू पॉल राफेल आणि शेन वॉर्न यांची नावे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही खेळाडूंनी 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली होती.

AUS vs AFG: मॅक्सवेल-कमिन्सने रचला इतिहास, एकदिवशीय क्रिकेटमध्ये असी कामगिरी करणारे ठरली पहिली जोडी..

AUS vs AFG: सामन्याची माहिती, स्कोरकार्ड

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 91 धावांत 7 विकेट गमावल्या, मात्र ग्लेन मॅक्सवेलने 128 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या खेळीत मॅक्सवेलने 21 चौकार आणि 10 षटकारही मारले.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *